Reasi Bus Attack Dainik Gomantak
देश

Reasi Bus Attack: ‘’बस दरीत कोसळल्यानंतरही दहशतवाद्यांनी अंदाधुंद फायरिंग सुरुच ठेवली...’’; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थक्क करणारा अनुभव!

Manish Jadhav

Reasi Bus Attack: जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे रविवारी संध्याकाळी यात्रेकरुंच्या बसवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. हे यात्रेकरु रियासी जिल्ह्यातील प्रसिद्ध शिव मंदिर शिवखोडी येथून दर्शन घेऊन परत होते. याचदरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्याने बस खोल दरीत कोसळली. ज्या प्रत्यक्षदर्शींनी हा हल्ला पाहिला त्यांनी सांगितले की, बस दरीत कोसळल्यानंतरही दहशतवाद्यांनी अनेक मिनिटे गोळीबार सुरुच ठेवला. याशिवाय, एका वाचलेल्या व्यक्तीने बस खोल दरीत कोसळण्यापूर्वी दहशतवाद्यांनी 25-30 गोळ्या झाडल्याचे सांगितले. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी दहा यात्रेकरुंच्या मृत्यूची पुष्टी केली.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याने लाल मफलर घातलेला एक दहशतवादी बसवर गोळीबार करताना पाहिला. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले उत्तर प्रदेशचे संतोष कुमार यांनी सांगितले की, मी बस ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो. तेव्हा मला लष्कराच्या जवानाप्रमाणे कपडे घातलेला आणि चेहरा आणि डोके झाकलेला एक माणूस दिसला. त्याने तडक बससमोर येऊन अंदाधुंद फायरिंग सुरु केली.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘’गोळीबारादरम्यान ड्रायव्हरला गोळी लागल्याने बस खोल दरीत कोसळली. त्यानंतरही दहशतवाद्यांनी बसवर अनेक मिनिटे गोळीबार सुरुच ठेवला. आम्ही त्यावेळी असहाय होतो, परंतु काही स्थानिक लोकांनी तात्काळ येऊन आम्हाला मदत केली. त्यानंतर काही पोलिसही तिथे पोहोचले.’’

दरम्यान, प्राथमिक अहवालात दहशतवाद्यांनी यांत्रेकरुंच्या बसला लक्ष्य केल्याचे समोर आले. अंदाधुंद फायरिंगमुळे ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे बस दरीत कोसळली. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. मात्र प्रवाशांची ओळख पटलेली नाही, परंतु ते स्थानिक नाहीत. शिव खोरी मंदिराभोवतालची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले.

दुसरीकडे, पीडित जखमींना तात्काळ भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने जम्मूच्या जीएमसीमध्ये हलवण्यात आले आहे. पोलीस आणि इतर दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची तात्काळ नाकेबंदी करण्यात आली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसह सुरक्षा दलांनीही सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचाही आढावा घेतला. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी माहिती दिली की, पंतप्रधानांनी त्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT