Lalu Prasad Yadav  Dainik Gomantak
देश

लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन

चारा घोटाळ्याशी संबंधित डोरंडा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

Lalu Prasad Yadav Bail: चारा घोटाळ्याशी संबंधित डोरंडा ट्रेझरी प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाला आहे. हे प्रकरण डोरंडा कोषागारातून 139 कोटी रुपये काढण्याबाबतचे आहे. 1990 ते 1995 दरम्यान डोरांडा तिजोरीतून 139 कोटी रुपये काढण्यात आले. सुमारे 27 वर्षांनंतर, या वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यायालयाने या घोटाळ्यावर आपला निर्णय दिला होता, ज्यामध्ये लालू यादव (Lalu Prasad Yadav) दोषी आढळले होते. या प्रकरणी लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे.

दरम्यान, 1996 मध्ये सीबीआयने वेगवेगळ्या कोषागारांमधून चुकीच्या पद्धतीने रक्कम काढल्याप्रकरणी 53 खटले लालू प्रसाद यांच्याविरोधात दाखल केले होते. हा पैसा जनावरे आणि त्यांच्या चाऱ्यावर खर्च केल्याचे सांगण्यात आले. 53 प्रकरणांपैकी डोरांडा ट्रेझरीचे प्रकरण सर्वात मोठे होते. ज्यामध्ये सर्वाधिक 170 आरोपींचा समावेश आहे. यातील 55 आरोपींचा मृत्यू झाला आहे.

इतर प्रकरणांमध्येही शिक्षा झाली

लालू यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधित 4 प्रकरणांमध्ये यापूर्वीच शिक्षा झाली आहे. चाईबासा कोषागारातून 37.7 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी लालू यादव जामिनावर बाहेर आहेत. यामध्ये त्यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. देवघर कोषागारातून 79 लाख रुपये बेकायदेशीररित्या काढल्याच्या घोटाळ्याच्या दुसऱ्या प्रकरणातही ते जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाली होती. लालू यादव यांना चाईबासा कोषागारातून 33.13 कोटी रुपये बेकायदेशीररित्या काढण्याच्या तिसऱ्या प्रकरणातही जामीन मिळाला आहे. या प्रकरणी त्यांना 5 वर्षांची शिक्षा झाली होती. दुमका कोषागारातून बेकायदेशीरपणे 3.13 कोटी काढल्याच्या चौथ्या प्रकरणात त्यांन दोन वेगवेगळ्या कलमांतर्गंत 7-7 वर्षांची शिक्षा झाली होती, मात्र त्यातही ते जामिनावर बाहेर आहेत.lalu prasad yadav

याशिवाय, राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (73) यांना डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर 21 फेब्रुवारी 2022 रोजी विशेष केंद्रीय अन्वेषण (CBI) न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. चारा घोटाळ्यात कारावास आणि 60 लाखांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT