Opposition Meeting Dainik Gomantak
देश

'Jeetega Bharat': महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सुचवली टॅगलाइनची आयडिया अन् 24 तासांत टीम इंडियाला 'जीतेगा भारत'ची जोड

Opposition Meeting: 2024 ची लोकसभा निवडणूक 'मोदी विरुद्ध इंडिया' अशी लढत असेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Ashutosh Masgaunde

Opposition Unity: विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'INDIA'ची टॅगलाइन 'जीतेगा भारत' असू शकते. यापूर्वी विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचे नाव 'इंडिया' असे जाहीर केले होते.

ही टॅगलाइन 2024 च्या लोकसभा प्रचारासाठी निवडली जाऊ शकते. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत 'भारत एक होईल, भारत जिंकेल' असे लिहिले आहे.

टॅगलाइनची आयडिया महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सुचवली

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी 'इंडिया' या विरोधी पक्षांच्या आघाडीला हिंदी टॅगलाइन असावी, असे सुचवले.

काल बेंगळुरू येथे संपलेल्या दोन दिवसीय विरोधी पक्षांच्या बैठकीत परिषदेत I.N.D.I.A. हे नाव निश्चित करण्यात आले.

'मोदी विरुद्ध इंडिया' अशी लढत होईल - राहुल गांधी

2024 ची लोकसभा निवडणूक 'मोदी विरुद्ध इंडिया' अशी लढत असेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

गांधी म्हणाले, 'लढा एनडीए आणि इंडिया, नरेंद्र मोदी आणि इंडिया, त्यांची विचारधारा आणि इंडिया यांच्यात आहे.

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'नकारात्मकतेवर बांधलेली युती कधीही जिंकत नाही'.

ते म्हणाले, 'कोणतीही युती घराणेशाही आणि भ्रष्ट असेल तेव्हा देशाचे नुकसान होते.' I.N.D.I.A. नावाचा प्रतिकार करण्यासाठी, पंतप्रधानांनी 'भारत' बद्दल बोलले आणि सांगितले की NDA गरीब आणि मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करते.

प्रादेशिक भाषांमध्येही टॅगलाइन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हिंदी टॅगलाइन अनेक प्रादेशिक भाषांमध्ये केली जाण्याची शक्यता आहे.

18 जुलै रोजी बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीदरम्यान अनेक नेत्यांना वाटले की युतीच्या नावात 'भारत' हा शब्द असावा. याचा समावेश टॅगलाइनमध्ये करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT