Former JDS Leader Killed Dainik Gomantak
देश

Former JDS Leader Killed: कर्नाटकात JDS नेत्याची हत्या; भाजपमध्ये करणार होते प्रवेश

कलबुर्गी येथील घटना; दुकानात आढळला मृतदेह, दगडाने मारहाण झाल्याचे निष्पन्न

गोमन्तक डिजिटल टीम

Former JDS Leader Killed In Karnataka: कर्नाटकता जनता दल सेक्युलर (JDS) पक्षाच्या एका माजी नेत्याची हत्या करण्यात आली आहे. कलबुर्गी येथे ही घटना घडली आहे. मल्लिकार्जुन मुथ्याल (Mallikarjun Muthyal) असे या नेत्याचे नाव आहे. 64 वर्षीय मुथ्याल यांच्या गुप्तांगावर व्रण आढळून आले आहेत.

हत्येपुर्वी एक दिवस आधी मुथ्याल हे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुथ्याल हे कलबुर्गी जिल्ह्यातील असून काही दिवसात ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते.

पोलिसांच्या माहितीनुसार मुथ्याल यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्याच दुकानात आढळून आला आणि त्यांच्याकडील रोकड गायब होती. ते एका इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या दुकानाचे मालक होते. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना यात चोरीच्या इराद्याने हत्या झाल्याचा संशय आहे. त्यांच्या गुप्तांगावर मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत. त्यांना दगडाने मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

दुकानात चोरीची घटना झाल्यापासून मुथ्याल हे दुकानातच झोपत होते. हा चोरीचा प्रकार असू शकतो, दुकानातील पैसे आणि साहित्य लुटून नेले आहे, अत्यंत निर्घृणपणे ही हत्या केली आहे. दस्तऐवजही फाडले आहेत, असे त्यांचा मुलगा व्यंकटेश याने म्हटले आहे.

मुथ्याल हे कोली कबालीगा समुदायाचे तालुकाध्यक्ष होते. हा राज्यातील वोक्कलिग, लिंगायत आणि कुरूबा या समाजानंतर चौथ्या क्रमांकाचा मोठा समाज आहे. मुथ्याल यांनी नुकताच जेडीएस पक्षाचा राजीनामा दिला होता. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT