Javed Akhtar trolls Dainik Gomantak
देश

Javed Akhtar : ".....तर मी नरकात जाणं जास्त पसंत करेन" जावेद अख्तर यांनी ट्रोलर्स आणि पाकिस्तानवर केली थेट टीका

Javed Akhtar controversy: "मला दोन्ही बाजूंचे लोक शिव्या देतात. एक मला काफिर म्हणतात आणि मी नरकात जाईन असं म्हणत हिणवतात"

Akshata Chhatre

Javed Akhtar statement: मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जावेद अख्तर यांनी ऑनलाइन ट्रोलिंगवर परखड मतं मांडली. त्यांना हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांकडून मिळणाऱ्या द्वेषाबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

ते म्हणाले, "मला दोन्ही बाजूंचे लोक शिव्या देतात. एक मला काफिर म्हणतात आणि मी नरकात जाईन असं म्हणत हिणवतात. दुसरे मला जिहादी म्हणतात आणि पाकिस्तानात जायला सांगतात. त्यामुळे, जर माझ्याकडे फक्त नरकात किंवा पाकिस्तानात जायचा पर्याय असेल, तर मी नरकात जाणं जास्त पसंत करेन."

त्यांच्या या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि हसले, पण त्यांच्या शब्दांतील नाराजी स्पष्ट दिसत होती. हे वक्तव्य भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे.

अख्तर पुढे म्हणाले, "मला दोन्ही बाजूंचे लोक शिव्या देतात, हे एकतर्फी नाही. जे लोक माझी प्रशंसा करतात, मला पाठिंबा देतात, माझी स्तुती करतात आणि मला प्रोत्साहन देतात, त्यांचे आभार मानले नाहीत तर मी कृतघ्न ठरेन."

अनेक वर्षांपासून एक्सट्रिमिस्टवादी हल्ले त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे हे स्वीकारत जावेद अख्तर म्हणाले "एका बाजूचे एक्सट्रिमिस्टवादी मला शिव्या देतात, तसेच दुसऱ्या बाजूचे एक्सट्रिमिस्टवादीही देतात. हे वास्तव आहे. जर त्यापैकी एकाने जरी मला शिवी देणं थांबवलं, तर मला तो एक अपवाद वाटेल आणि माझ्याकडून काहीतरी चूक झाली असावी असंच मला वाटेल."

या पुस्तक प्रकाशनाच्या काही आठवड्यांपूर्वी, महाराष्ट्र दिनाच्या एका कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी पाकिस्तान आणि दहशतवादावर कठोर भाषण केलं होतं. ते म्हणाले होते, "सीमावर्ती भागात फक्त काही फटाक्यांनी काही होणार नाही. आता ठोस पाऊल उचला. असं काहीतरी करा की तिथल्या वेड्या लष्कर प्रमुखासारखं भाषण कोणताही समजूतदार माणूस करणार नाही." त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले महाराष्ट्रातील तीन नागरिक - संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांना श्रद्धांजली वाहिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT