जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेत आहेत. याच पाश्वभूमीवर इंडो-पॅसिफिकमधील सुरक्षा संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने युक्रेनवरील एकसंध दृष्टिकोनाला चालना देण्याबाबत चर्चा करणार आहेत. (Japan plans to invest 42 billion in India)
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान जपानचे (Japan) पंतप्रधान भारतात पुढील पाच वर्षांसाठी 42 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करु शकतात. युक्रेनमधील परिस्थितीवरही दोन्ही नेते चर्चा करतील, असे मानले जात आहे. 2022 मध्ये भारताला भेट देणारे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) हे पहिले राष्ट्रप्रमुख आहेत.
दरम्यान, भारतासोबत (India) सुरक्षा आणि आर्थिक संबंध मजबूत करण्याचेही पंतप्रधान किशिदा यांचे उद्दिष्ट असणार आहे. जपानच्या निक्केई वृत्तपत्राने म्हटले की, 'या भेटीदरम्यान ते पुढील पाच वर्षांत भारतात 5 ट्रिलियन येन (42 Billion) गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर करतील. याशिवाय पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत जपानी कंपन्यांच्या भारतातील विस्ताराचीही घोषणा केली जाऊ शकते.'
शिवाय, जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांनी 2014 मध्ये भारत भेटीदरम्यान 5 वर्षांमध्ये गुंतवणूक आणि वित्तपुरवठा करण्यासाठी 3.5 ट्रिलियन येनची घोषणा केली होती. जपान भारताच्या शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि बुलेट ट्रेन (Bullet Train) तंत्रज्ञानावर आधारित हाय-स्पीड रेल्वेला पाठिंबा देत आहे. दोन्ही नेते 14 व्या भारत-जपान शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.