दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर सेलने मंगळवारी झारखंडमधील जामतारा (Jamtara) येथून ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या मोठ्या टोळीतील 14 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या 14 आरोपींमध्ये मुख्य आरोपी गुलाम अन्सारी आणि अल्ताफ यांचाही समावेश आहे. आरोपींकडून 2 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 20 लाख रुपयांची एस.यू.व्ही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींमध्ये नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदवलेल्या वेगवेळ्या 9 राज्यांतील 36 प्रकरणांमधील आरोपी आहेत. या 36 प्रकरणांमध्ये त्यांनी सुमारे 1.2 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर दररोज 4-5 लोकांना फसवल्याची कबुली देखील या आरोपींनी दिली असल्याचे समजते आहे.
रॉकस्टार' आणि 'मास्टरजी' हे या टोळीचे मास्टरमाईंड
याबाबत माहिती देताना दिल्ली पोलीस सायबर सेलचे डी.सी.पी. अनेश रॉय म्हणाले की, सायबर प्रहार भाग -2 मध्ये आम्ही सायबर क्राईमचे हॉटस्पॉट असलेल्या जामतारा पट्ट्याला लक्ष्य केले आहे. यामध्ये जामतारा, देवघर, गिरीडीह, जमुई या ठीकाणांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मोठी कारवाई असल्याचे समजते आहे. या कारवाईत 14 लोकांना अटक करण्यात आली आहे जे फसवणुकीची एक मोठी टोळी चालवत होते.
अटक केलेल्या या आरोपींनी बँक अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आणि कधीकधी ई-शॉपिंग कंपन्यांकडून ऑफर देत असल्याचे सांगत फसवले आहे. त्यांनी सांगितले की, या रॅकेटचे मास्टरमाईंड अल्ताफ अन्सारी उर्फ 'रॉकस्टार' आणि गुलाम अन्सारी उर्फ 'मास्टरजी' आहेत. अल्ताफकडे भरपूर कॉलर आहेत आणि त्यांच्या मदतीने तो पोलिसांच्या हालचालींवर सुद्धा नजर ठेवत होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.