J&K Under BJP Govt: जम्मू-काश्मीरला 'पृथ्वीवरील स्वर्ग' म्हणतात. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांचा परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे.
जम्मू आणि काश्मीर हे अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व यासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, हे राज्य गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष, दहशतवाद आणि अस्थिरतेने प्रभावित आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने या राज्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. सरकारने पायाभूत सुविधा सुधारण्यावर, कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि पर्यटन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे हा प्रदेश देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला. नवीन महामार्ग, विमानतळ आणि रेल्वे नेटवर्कच्या विकासामुळे राज्यात भरभराट दिसून येतेय. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढू दिसून आलीय, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
जम्मू-काश्मीरबाबत पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा मुख्य आधार विकास आणि शांतता आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटवणे हा या प्रदेशासाठी एक ऐतिहासिक निर्णय होता. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरला खऱ्या अर्थाने भारताशी जोडण्यात आले. याच निर्णयामुळे राज्यात गुंतवणूक, आर्थिक वाढ आणि नवीन संधींसाठी दरवाजे उघडले.
जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणे हे भारताच्या एकता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. या पाऊलामुळे लोकांमध्ये अभिमान आणि आत्मीयतेची भावना जागृत झाली. एवढचं नाहीतर भारत आपल्या प्रादेशिक अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कटिबद्ध असल्याचा संदेशही मोदी सरकारने जगाला दिला.
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक विकास प्रकल्प सुरु केले आहेत. यामध्ये शैक्षणिक संस्थांची स्थापना, आरोग्य सेवा आणि औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. सरकारने कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केल्याने तरुणांना एक चांगले भविष्य घडवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
भाजप सत्तेत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेतील सुधारणा. एकेकाळी दहशतवाद आणि हिंसाचाराचा प्रभाव असलेल्या या राज्यात हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारचे कठोर धोरण आणि सशस्त्र दलांना भक्कम पाठिंबा यांचा हा परिणाम आहे.
सुरक्षा दलांची वाढती उपस्थिती आणि गुप्तचर कारवाया यामुळे दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांचे नेटवर्क कमकुवत झाले आहे, ज्यामुळे या प्रदेशात शांतता आणि सुरक्षा पूर्ववत झाली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवनात शांतता तर आलीच पण पर्यटकही भयमुक्तपणे राज्यात फिरु लागले.
पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो आता अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे. पृथ्वीवरील स्वर्ग पाहण्यासाठी पर्यटक पुन्हा गर्दी करु लागले आहेत. पर्यटनातील या वाढीचा हॉस्पॅलिटी, ट्रान्सपोर्ट आणि हस्तकला यासारख्या विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम झाला आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यादरम्यान या भागात लोकांची लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी दिसून आली. अनेक वर्षांच्या राजकीय अस्थिरतेनंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये विक्रमी मतदान झाले, जो लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास दर्शवतो. या निवडणुकांचे यशस्वी आयोजन हे भाजप सरकारचे एक मोठे यश आहे, ज्याने जनतेचा आवाज ऐकला आणि प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कठोर परिश्रम घेतले. बंपर मतदानावरुन जम्मू-काश्मीरमधील लोकांची लोकशाही मूल्यांप्रती उत्सुकता समजून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.