CRPF Dainik Gomantak
देश

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, पोलिस पथकाला केले लक्ष्य

Terrorist Attack in Anantnag: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Terrorist Attack in Anantnag: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात दहशतवाद्यांनी पोलिस/सीआरपीएफच्या संयुक्त नाका पार्टीवर गोळीबार केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरु आहे.

यापूर्वी बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी (Terrorists) बिहारमधील एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करुन सांगितले की, "मध्यरात्री बिहारमधील मधेपुरा येथील बेसध येथील रहिवासी मोहम्मद अमरेज, मुलगा मोहम्मद जलील, सोडनारा संबल यांच्यावर बांदीपोरात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये ते जखमी झाले." अमरेज यांना रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले, मात्र तिथेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, हे हल्ले अशा वेळी होत आहेत, जेव्हा संपूर्ण देश सोमवारी स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या छावणीवर आत्मघाती हल्ला केला, ज्यात चार जवान शहीद झाले. सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवादीही ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी घातक 'स्टील कोअर' गोळ्यांनी सज्ज होते. तर चार तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले.

दुसरीकडे, पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले की, 'हल्ला करणारे दोघेही हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असावेत. दोघांनी छावणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मारले गेले. या कारवाईत भारतीय लष्कराचे (Indian Army) सहा जवान जखमी झाले, त्यापैकी चार जवान नंतर शहीद झाले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT