Jammu kashmir Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir: काश्मीरमध्ये पुन्हा 'टार्गेट किलिंग', यूपीच्या मुकेशची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी दहशतवाद्यांनी यूपीमधील एका मजुराची गोळ्या झाडून हत्या केली.

Manish Jadhav

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी दहशतवाद्यांनी यूपीमधील एका मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, हे टार्गेट किलिंगचे प्रकरण आहे, ज्या अंतर्गत दहशतवाद्यांनी दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या व्यक्तीला लक्ष्य केले आहे.

काही महिन्यांपूर्वीही अशा अनेक घटना घडल्या होत्या, ज्यात स्थानिक हिंदू आणि बाहेरील मजुरांना लक्ष्य करण्यात आले होते. प्रशासनाच्या कारवाईनंतर घटना कमी झाल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग करण्याचे धाडस केले आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे की, यूपीचा रहिवासी असलेल्या मुकेशला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. उपचारादरम्यान मुकेशचा मृत्यू झाला. सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

पोलीस आणि लष्कराचे जवान दहशतवाद्यांच्या शोधात व्यस्त आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी मसरुर अहमद वाणी यांच्यावर क्रिकेट मैदानावर झालेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.

वाणी क्रिकेट खेळत होते यादरम्यान एका दहशतवाद्याने (Terrorists) त्यांच्यावर अगदी जवळून तीन वेळा गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या डोळ्याला, दुसरी पोटात आणि तिसरी मानेला लागली.

दुसरीकडे, वाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर पुलवामा (Pulwama), अनंतनाग आणि श्रीनगरमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुख्य रस्ते, चौक्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

याशिवाय, येणाऱ्या-जाणाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. सोमवारी सकाळीच सुरक्षा दलांनी कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT