Jammu And Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: दोन दिवसांत 6 हिंदूंची हत्या, लहान मुलांनाही दहशतवाद्यांकडून केलं जातयं लक्ष्य

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटना नव्या वर्षात वाढल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटना नव्या वर्षात वाढल्या आहेत. या केंद्रशासित प्रदेशात गेल्या दोन दिवसांत 6 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. दहशतवादी लहान मुलांनाही सोडत नाहीत. राजौरीतील डांगरी गावात दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या घराजवळ सोमवारी आयईडी स्फोट झाला, त्यात 2 मुले ठार आणि 6 जण जखमी झाले. 4 वर्षीय विहान आणि 16 वर्षीय समिक्षा अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याआधी, रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी (Terrorists) याच भागातील तीन घरांवर गोळीबार केला होता, त्यात 4 नागरिक ठार, 6 जण जखमी झाले होते. सतीश कुमार (45), दीपक कुमार (23), प्रीतम लाल (57) आणि शिशुपाल (32) अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय पवन कुमार (38), रोहित पंडित (27), सरोज बाला (35), रिदम शर्मा (17) आणि पवन कुमार (32) अशी जखमींची नावे आहेत. या दोन्ही दहशतवादी घटना अवघ्या 14 तासांच्या अंतराने घडल्या आहेत.

दहशतवादी हल्ल्यातील बळी प्रीतम लाल यांच्या घराजवळ स्फोट झाला

प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की, दहशतवादी हल्ल्यातील बळी प्रीतम लाल यांच्या घराजवळ आज सकाळी स्फोट झाला. मृतांव्यतिरिक्त, सर्व जखमी देखील हिंदू आहेत, ज्यांची ओळख सानवी शर्मा (4), कनया शर्मा (14), वंशू शर्मा (15), समिक्षा देवी (20), शारदा देवी (38), कमलेश देवी (55) आहेत. .आणि समिक्षा शर्माच्या रुपात झाली. मात्र, समिक्षा शर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सोमवारी सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान हा स्फोट झाला जेव्हा रविवारच्या हल्ल्यातील पीडितेच्या नातेवाईकांसह अनेक लोक घरात उपस्थित होते.

'अल्पसंख्याक समाजातील लोकांना सुरक्षित वाटत नाही'

सरपंच दीपक कुमार म्हणाले की, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांच्या सुरक्षेतील ही गंभीर त्रुटी आहे. ते पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील लोकांना सुरक्षित वाटत नाही. प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. त्याचवेळी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) डांगरी गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरीची घोषणा त्यांनी केली.

हिंदूंवरील हिंसाचाराचा जिल्हाव्यापी निषेध

हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात राजौरी शहरासह जिल्हाभरात निदर्शने सुरु झाली आहेत. हे लोक त्यांच्या सुरक्षिततेची आणि न्यायाची मागणी करत आहेत. दरम्यान, एनआयएचे एक पथक डांगरी येथे पोहोचले असून प्राथमिक तपास सुरु आहे. त्याचवेळी जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ते म्हणाले की, लष्कर आणि पोलिस मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT