जम्मू काश्मिरात वाढते हल्ले (Terrorist Attack) पाहता आता काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना (Jammu Kashmir Police) बुलेट प्रूफ वाहने दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान काल झालेला हल्ला हा नियोजित पद्धतीने केला. बसमध्ये बसलेले हे सुरक्षा कर्मचारी दररोज या मार्गावरून जातात हे दहशतवाद्यांना माहीत होते.एवढेच नाही तर रोड ओपनिंग टीम्स मागे घेत असतानाच त्यांनी हा हल्ला केला. पण मी दहशतवादी संघटनांना हे स्पष्ट करू इच्छितो की, आमच्या जवानांवर हल्ला करणारे दहशतवादी कुठेही लपले असतील, त्यांचा शोध घेतला जाईल. लवकरच ते आमच्या तावडीत येतील. त्यांची ओळख पटली असा इशारा काश्मीर पोलीसचे आयजीपी विजय कुमार (Vijay Kumar) यांनी दिला आहे. (Jammu Kashmir police will use bullet proof vehicles says Kashmir police IGP Vijay Kumar)
त्याचबरोबर त्यांनी हा हल्ला तीन दहशतवाद्यांनी केला असून त्यात दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक दहशतवादी सामील होता. स्थानिक दहशतवाद्याला लवकरच पकडले जाईल आणि लवकरच संपूर्ण गटाचा खात्मा केला जाईल असेही सांगितले आहे. हल्लेखोरांनी अगोदरच परिसराची रेकी करून हा हल्ला केला असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सुरक्षा दलांची रोड ओपनिंग टीम मागे घेतल्यानंतर हा हल्ला झाला. आधी पोलिसांना ठार मारायचे आणि नंतर त्यांची शस्त्रे काढून घ्यायची, हा त्यांचा उद्देश होता, पण जखमी होऊनही जवानांनी दहशतवाद्यांशी जिद्दीने मुकाबला करून त्यांचा उद्देश हाणून पाडला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादीही जखमी झाला असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर त्यांनी हा हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा वेगळा गट असलेल्या काश्मीर टायगर्सच्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांची कारवाई सुरू असून आमच्या जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत तीन दहशतवाद्यांपैकी एक जखमी झाल्याचे मी आधीच सांगितल्याप्रमाणे, पंपोरमध्ये त्याच्या रक्ताचे अंश सापडले आहेत. तेथून दहशतवाद्यांचा हा गट पुलवामातील त्राल येथे पळून गेला आहे. आमच्याकडे इतर दहशतवादी आहेत. सुगावा देखील आहेत. आम्ही लवकरच गट शोधू. असा विश्वास विजय कुमार यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.