Jammu-Kashmir Narwal Blast
Jammu-Kashmir Narwal Blast Dainik Gomantak
देश

Perfume Bomb: जम्मू-कश्मीरमध्ये पहिल्यांदाच सापडला परफ्यूम बॉम्ब, खोऱ्यात उडाली खळबळ

दैनिक गोमन्तक

Jammu-Kashmir Terrorism: जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नरवाल भागात झालेल्या दुहेरी स्फोटात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याने परफ्यूम आयईडीचा वापर केला होता.

दरम्यान, पोलिसांनी (Police) त्याच्याकडून परफ्यूम आयईडीही जप्त केला आहे, जो पहिल्यांदाच सापडला आहे. 21 जानेवारीला खोऱ्यात हा हल्ला झाला होता. यामध्ये 9 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घाटीत पहिल्यांदाच परफ्युम आयईडी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हा आयईडी इतका धोकादायक आहे की, तो उघडण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा स्फोट होतो.

दुसरीकडे, पोलिसांनी आरिफ नावाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. तो तीन वर्षांपासून पाकिस्तानात (Pakistan) बसून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात होता. मिळालेल्या माहितीनुसार, 20 जानेवारीला दोन बॉम्ब पेरण्यात आले होते. विशेष म्हणजे, 21 जानेवारीला 20 मिनिटांच्या अंतराने घाटीत दोन स्फोट झाले होते. दरीतून सापडलेल्या परफ्युम बॉम्बमुळे घटनास्थळी बरेच नुकसान झाले आहे.

परफ्यूम बॉम्ब मिळाल्यानंतर डीजीपी यांनी ही माहिती दिली

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, '21 जानेवारीला जम्मूच्या नरवालमध्ये 2 आयईडी स्फोट झाले. या घटनेप्रकरणी आरिफ नावाच्या दहशतवाद्याला (Terrorists) अटक करण्यात आली असून तो रियासी येथील रहिवासी आहे. तो गेल्या 3 वर्षांपासून सीमेपलीकडील लष्कर-ए-तैयबाच्या हस्तकांशी संपर्कात होता.'

तसेच, फेब्रुवारी 2022 मध्ये शास्त्रीनगरमध्ये आयईडी स्फोट झाला होता. त्या स्फोटामागेही आरिफचा हात होता. कटरा येथे झालेल्या स्फोटानंतर बसला आग लागली होती. आरिफने बसमध्ये आयईडी ठेवल्याचेही मान्य केले आहे. त्याच्याकडून एक आयईडीही जप्त करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये आरिफला तीन आयईडी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नरवालमध्ये त्याने यापैकी दोन वापरले. या भागात तो दहशतवादी कारवाया करण्यात गुंतलेला आहे.

डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, 'आरिफचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी आहे. पाकिस्तान आपली भूमी दहशतवाद्यांना वापरु देत आहे. याचा वापर करुन दहशतवादी जगभरात निरपराध लोकांची हत्या करत आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT