Jammu Kashmir Accident:  Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir Accident: जम्मूच्या अखनूरमध्ये भीषण अपघात, भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 16 ठार, 28 जण जखमी

Jammu Kashmir Accident: जम्मूच्या अखनूरमध्ये भाविकांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली.

Manish Jadhav

Jammu Kashmir Accident: जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मूतील अखनूरमध्ये भाविकांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. बस अपघातात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 28 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचे मृतदेह बसमध्ये अडकले. बचाव पथकाला मोठ्या अडचणीत पीडितांना बाहेर काढावे लागले. स्थानिक लोकांनीही बचावकार्यात बचाव पथकाला मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अखनूरच्या चुंगी मढ भागात ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. बसमध्ये मोठ्याप्रमाणात भाविक होते. बसमधून प्रवास करणारे सर्व भाविक हरियाणातील कुरुक्षेत्रचे रहिवासी असून ते शिव खोरी दर्शनासाठी जात होते. बस अखनूरच्या चुंगी मढ भागातील टांगली मोढ येथून जात असताना बस 150 फूट खोल दरीत कोसळली.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

दरम्यान, बस खोल दरीत कोसळल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. यानंतर, पोलीस आणि स्थानिक लोकांनी बचाव सुरु कार्य केले. बसमधील भाविकांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. जिथे त्यांच्या उपचाराची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

गंभीर जखमींना जम्मू मेडिकलमध्ये दाखल केले

जम्मू मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक नरिंदर सिंग यांनी सांगितले की, पहिली माहिती सीएसई अखनूरच्या माध्यमातून देण्यात आली होती. हे सर्व लोक जम्मूचे रहिवासी नसून तीर्थयात्री असल्याचे त्यांनी सांगितले. सीएसईला सांगण्यात आले की, 20-25 जखमी लोकांना रेफर करण्यात आले आहे. त्यापैकी 16 रुग्ण वैद्यकीय केंद्रात पोहोचले आहेत.

अपघाताचे सत्र सुरुच

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही जम्मू-काश्मीरमधील डोडा भागात प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली होती. बसच्या अपघातामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जम्मू-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरील चिनाब नदीजवळ हा अपघात झाला होता. या अपघातात 38 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये अनेक बस अपघात झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर मात करूनही Team Indiaचं नुकसान, पॉइंट्स टेबलमध्ये झाली घसरण

SCROLL FOR NEXT