Indian Army kills terrorists jammu kashmir Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir Gurez: LOC जवळ घुसखोरीचा डाव उधळला, 2 दहशतवादी ठार; भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई

Indian Army kills terrorists: चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, सैन्याच्या जवानांना गुरेझ भागात संशयास्पद हालचाल आढळून आली. या दरम्यान दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला.

Sameer Panditrao

बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, सैन्याच्या जवानांना गुरेझ भागात संशयास्पद हालचाल आढळून आली. या दरम्यान दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी अचूक कारवाई करून दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले. या मोहिमेत लष्कराची कोणतीही हानी झाली नाही. कारवाई अद्याप सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय सैन्याने एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की – “जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुरेझ सेक्टरमध्ये संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सतर्क जवानांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून कारवाई केली. दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, मात्र जवानांनी प्रभावी प्रत्युत्तर देत त्यांना ठार केले.”

याआधी 13 ऑगस्ट रोजी उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील चुरुंदा भागात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला होता. त्या कारवाईत भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला होता. तरीही सैन्याने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.

गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेजवळ घुसखोरीचे प्रयत्न वाढले असून भारतीय सैन्य व जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तपणे दक्षता ठेवून कारवाई करत आहेत. गुरेझ सेक्टरमधील ही ताजी कारवाई भारतीय सैन्याच्या सतर्कतेचे उदाहरण ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT