Jammu and Kashmir Bus Accident Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir Bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; 21 मृत्यू, 61 जण गंभीर जखमी

Jammu and Kashmir Bus Accident Today: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली. रामनगर-उधमपूर महामार्गावरील कागोर्ट गावाजवळ प्रवाशांनी भरलेली एक बस उलटून भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

Jammu and Kashmir Bus Accident: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली. रामनगर-उधमपूर महामार्गावरील कागोर्ट गावाजवळ प्रवाशांनी भरलेली एक बस उलटून भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत 21 जणांनी आपला जीव गमावला असून 61 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (20 एप्रिल) सकाळी झालेला हा अपघात इतका भीषण होता की, बस महामार्गावरुन घसरली आणि कागोर्ट गावाजवळ पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका दुर्गम गावातून उधमपूरच्या दिशेने जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अतिवेगामुळे बस घसरली आणि ही मोठी दुर्घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनाने बचाव कार्याला वेग दिला आहे. उपजिल्हा दंडाधिकाऱ्यांनी (SDM) या घटनेची तातडीने दखल घेत जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. उधमपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या दुर्घटनेबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी खोल दुःख व्यक्त केले. डॉ. सिंह यांनी उधमपूरचे जिल्हा आयुक्त मिंगा शेर्पा यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. डॉ. सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. गंभीर जखमींना एअरलिफ्ट करण्याची म्हणजेच हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मोठ्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली जात आहे. "आम्ही स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.

विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) रस्ते अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. कालच राजौरी जिल्ह्यात अशाच प्रकारचा एक अपघात झाला होता, ज्यामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरचे नियंत्रण सुटल्याने 18 जण जखमी झाले होते. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या उधमपूरमधील घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवांचे पथक तैनात असून, बसच्या ढिगाऱ्याखालून प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT