Jammu Kashmir: 3 terrorists killed in Shopian Encounter
Jammu Kashmir: 3 terrorists killed in Shopian Encounter Dainik Gomantak
देश

शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा,लष्कराने घेतला बदला

दैनिक गोमन्तक

जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सुरक्षा दलांनी काल शाहिद झालेल्या पाच जवानांच्या बदला घेतला आहे. आज शोपियानमध्ये (Shopian) झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा (Security force) दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख गंदरबल (Ganderbal) येथील मुख्तार शाह अशी झाली आहे, ज्याने काहीदिवसांपूर्वी बिहारमधील रस्त्यावर विक्रेता वीरेंद्र पासवानची हत्या केली होती. (Jammu Kashmir: 3 terrorists killed in Shopian Encounter)

शोपियान चकमकीत (Shopian Encounter) ठार झालेले तीन दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी या चकमकीनंतर सांगितले आहे. सध्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रांसह आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या या परिसरात आणखी शोध मोहीम सुरू आहे.

मागील काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात दहशतवादी पुन्हा सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सतत खोऱ्यातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करत सुरक्षा दलांवर देखील हल्ला करत आहेत. काल, दहशतवाद्यांनी पुंछच्या सुरनकोट नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात घुसखोरीचा प्रयत्न केला. घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर त्या परिसराला घेराव आणि शोधमोहीम सुरू झाली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली, त्यानंतर एक जेसीओ आणि लष्कराचे 4 जवान गंभीर जखमी झाले. जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे उपचारादरम्यान चारही जवानांना वीरमरण आले.

दरम्यान काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आता अल्पसंख्यकांना लक्ष करत आहेत. त्याचबरोबर ते सातत्याने सामन्यांनवर आणि लष्करावर सतत हल्ले करत आहेत. जम्मू काश्मिरात कलम 370 हटवल्यानंतर दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसत आहे , परंतु बदललेल्या रणनीतीसह या साऱ्या परिसरात दहशतवाद पुन्हा पाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

SCROLL FOR NEXT