Terrorist 
देश

Jammu And Kashmir: काश्मीर खोऱ्यात पुन्हा टार्गेट किलिंग, दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरींना केले लक्ष्य

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दहशतवादी निष्पाप लोकांना लक्ष्य करत आहेत.

Manish Jadhav

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दहशतवादी निष्पाप लोकांना लक्ष्य करत आहेत. दरम्यान, सोमवारी सायंकाळी उशिरा अनंतनाग जिल्ह्यात त्यांनी एका स्थलांतरित नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूरमध्ये राहणाऱ्या दीपूला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. अनंतनागमधील एका खाजगी सर्कस मेळ्यात तो काम करत होता.

दरम्यान, दीपूवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी (Terrorist) घटनास्थळावरुन पळून गेल्याचे सांगण्यात आले.

त्याचवेळी, गोळी लागल्यावर, दीपूला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

दुसरीकडे, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दहशतवाद्यांनी अनंतनागमध्येच दोन गैर-स्थानिक मजुरांना लक्ष्य केले होते. 10 दिवसांत मजुरांवर झालेला हा दुसरा हल्ला होता. अनंतनागच्या रख-मोमीन भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

यादरम्यान दोन मजूर जखमी झाल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले होते. त्यानंतर दोन्ही जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी 29 लक्ष्य हल्ले केले

गेल्या वर्षी काश्मीरमध्ये अधिकाधिक नागरिकांना आणि ऑफ ड्युटी पोलिसांना लक्ष्य करण्यात आले होते. अधिकृत आकडेवारीत असे सांगण्यात आले की, दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये जवळपास 29 लक्ष्यित हल्ले केले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने बिगर स्थानिक मजूर आणि मुस्लिमेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मृतांमध्ये तीन स्थानिक प्रतिनिधी (पंच आणि सरपंच), तीन पंडित, एक स्थानिक महिला गायक, राजस्थानमधील एक बँक व्यवस्थापक, एक शिक्षक आणि जम्मूमधील एक सेल्समन, आठ गैर-स्थानिक मजुरांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान दहा गैर-स्थानिक जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

Goa Live News: "सरकारी नोकरी मिळाल्यावर पदाचा गैरवापर करू नका"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तरुणांना कडक इशारा

VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT