Anantnag Encounter: Dainik Gomantak
देश

Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमक, भारतीय लष्कराची कारवाई

काश्मीरमधील अनंतनाग येथील भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमधील अनंदवन संगम भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक झाली. या चकमकीत दोन ते तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

तसेच काश्मीर पोलीस आणि लष्कराचे जवान या भागात सातत्याने कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. 

  • गेल्या आठवड्यात देखील झाली होती चकमक 

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी (5 मे) रोजी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. राजौरीच्या मुठभेड जिल्ह्याच्या जंगलात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली.

त्यानंतर  संपूर्ण राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात एका लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले. 

याशिवाय बारामुला जिल्ह्यात (६ मे) रोजी जम्मू-काश्मीर पोलीस तसेच भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

काश्मीर पोलिसांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली होती. त्याचबरोबर दहशतवाद्यांकडून एके- 47 देखील जप्त करण्यात आली. या दहशतवाद्याचे नाव आबिद वानी असे होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांशी संबंधित होता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT