Uber  Dainik Gomantak
देश

Video Viral: Uber ड्रायव्हरचे महिला प्रवाशासोबत असभ्य वर्तन, फोन हिसकावला अन्...

Jaipur Influencer Claims Uber Driver: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये उबेर चालकाने महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Jaipur Influencer Claims Uber Driver: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये उबेर चालकाने महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली आहे.

पीडित महिला जयपूरची (Jaipur) रहिवासी आहे. मनाली गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. त्या एक व्हिडिओ ब्लॉगर आहेत. त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मनाली गुप्ता यांनी आपल्यासोबत कॅब चालकाने केलेल्या असभ्य वर्तनाचा व्हिडिओ पोस्ट केला.

मनाली यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलांना शाळेतून घेऊन येण्यासाठी उबेर कॅब बुक केली होती. कॅबमधून शाळेत जात असताना त्या फोनवर बोलत होत्या. त्याचदरम्यान कॅब चालकाने त्यांचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

मनाली यांनी विरोध केला असता कॅब चालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर मनाली यांनी कॅब चालकाला तात्काळ कॅब थांबवण्यास सांगितले, यावर कॅब चालकाने गाडी थांबवण्याऐवजी गाडीचा वेग वाढवला. मात्र, रस्त्यावर जाम होताच मनाली कॅबमधून खाली उतरल्या.

व्हिडिओच्या माध्यमातून मनाली यांनी तात्काळ उबेरच्या सुरक्षेबाबत कारवाई करण्याची मागणी केली. श्याम सुंदर असे कॅब चालकाचे नाव आहे. हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT