Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: विद्यार्थ्याने दिला ‘जय श्री राम’चा नारा, महिला शिक्षिकेने गेट आऊट म्हणत...

Viral Video: गाझियाबादमधील एका प्रायव्हेट महाविद्यालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Viral Video: गाझियाबादमधील एका प्रायव्हेट महाविद्यालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी स्टेजवरुन 'जय श्री राम'चा नारा देताना दिसत आहे.

विद्यार्थ्याने घोषणाबाजी सुरु केल्यानंतरच एका महिला शिक्षिकेने त्याला गेट आऊट म्हणत स्टेजवरुन खाली उतरवले. याशिवाय, आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिक्षिकेने स्टेजवरुन घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्याला 'बेकार' म्हटले.

व्हायरल व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गाझियाबादच्या एबीईएस महाविद्यालयातील आहे. हॉलमध्ये बसलेले काही विद्यार्थी 'जय श्री राम' म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

यानंतर स्टेजवर उभा असलेला विद्यार्थी माईकवर 'जय श्री राम भाई' म्हणतो. यानंतर लगेचच एका महिला शिक्षिकेने त्याला स्टेजवरुन खाली उतरण्यास सांगितले. शिक्षिका म्हणाली की, 'तु इथे नारेबाजी करायला आला नाहीये. हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे.'

यानंतर व्हिडिओमध्ये शिक्षिकेचा (Teacher) आवाज स्पष्ट ऐकू येत नाही पण काही वेळाने ती मोठ्या आवाजात 'गेट आऊट' म्हणते आणि हाताने इशारा करत त्याला स्टेजवरुन खाली उतरण्यास सांगते.

शिक्षिका काय म्हणाली?

महिला शिक्षिकेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शिक्षिका म्हणताना दिसत आहे की, 'आम्ही सगळे इथे एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलो आहोत. मग इथे ‘जय श्री राम’च्या घोषणा कशाला? याला काही तर्क नाही.

तुम्ही लोक शिस्तबद्ध राहाल तेव्हाच हा कार्यक्रम होईल, अन्यथा आम्ही भविष्यात असा कोणताही कार्यक्रम आयोजित करणार नाही. तू एबीईएस महाविद्यालयात बसला आहेस… काय बकवास बोलत आहेस?'

पोलिस कारवाई

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता महिला शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली जात आहे. व्हायरल व्हिडिओवर टिप्पणी करताना, गाझियाबाद पोलिस आयुक्तालयाने सांगितले की, 'स्टेशन प्रभारी क्रॉसिंग रिपब्लिक यांना तपास आणि योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT