IT Raid Dainik Gomantak
देश

IT Raid: कॉंग्रेस नेत्याच्या ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे; एवढी मोठी रोकड तुम्हीही चक्रवाल!

IT Raid: ओडिशा आणि झारखंडमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे आयकर विभागाच्या छाप्यात इतके पैसे सापडले की मशीनने मोजणेही बंद केले.

Manish Jadhav

IT Raid In Odisha and Jharkhand: देशात श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होत चालले आहे तर, गरीब व्यक्ती अधिकच गरीब... काही लोकांकडे एवढा पैसा आहे की नोटा मोजण्यासाठी मशीनही कमी पडत आहेत. ओडिशा आणि झारखंडमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे आयकर विभागाच्या छाप्यात इतकी रोकड सापडली की मशीनने मोजणेही बंद केले.

दरम्यान, झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. ओडिशात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर दारुचा व्यवसाय आहे. त्यांच्या नावावर बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीची ओडिशा आणि झारखंडमध्ये अनेक कार्यालये आहेत, जिथे बुधवारी आयकर विभागाने छापेमारी केली, जी गुरुवारीही सुरु आहे. करचुकवेगिरीच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या पथकाद्वारा सुरु असलेल्या शोधात नोटांचे इतके बंडल सापडले आहेत की मोजण्याचे मशीनही बंद पडले. आतापर्यंत आयकर विभागाला 50 कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे.

आयकर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर, संबलपूर आणि झारखंडमधील रांची, लोहरदगा इथे आयकर विभागाचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. यावेळी आयकर विभागाच्या पथकाने कंपनीच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. नोटांचे इतके बंडल आहेत की, मशिननेही काम करणे बंद केले. या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने नोटांच्या बंडलचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये कपाटात मोठ्या प्रमाणात रोकड दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT