PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Modi in USA: होऊदे खर्च! मोदींच्या परदेश दौऱ्यांवर तीन अब्जांहून अधिक खर्च; हे पाच दौरे ठरले महागडे

pmindia.gov.in या वेबसाइटनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 70 दौरे केले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी शंभरच्या आसपास खासगी परदेश दौरे केले आहेत.

Ashutosh Masgaunde

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून ते 24 जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी दौऱ्यांपैकी हा एक दौरा आहे. जिल बायडन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे अमेरिकेत त्यांचे यजमानपद भूषवतील. 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास संपूर्ण जगाचा दौरा केला आहे.

भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, आर्थिक सहकार्याला चालना देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि जागतिक स्तरावर भारताचे स्थान निर्माण करणे हा त्यांच्या परदेश दौऱ्यांचा उद्देश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोण कोणत्या देशांना भेट दिली?

www.pmindia.gov.in या वेबसाइटनुसार नरेंद्र मोदींनी 70 अधिकृत परदेश दौरे केले आहेत. त्यांनी 9 वर्षात 124 वैयक्तिक दौरेही केले आहेत. पंतप्रधान मोदींनी जागतिक स्तरावरील अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या महत्त्वाच्या बैठकांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. त्यांचा प्रत्येक प्रवास चर्चेत असायचा.

पंतप्रधान मोदींचा पहिला विदेश दौरा

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भूतानला भेट दिली. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाले. WION च्या अहवालानुसार, नरेंद्र मोदींच्या भूतान दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी जलविद्युत प्रकल्पासाठी परस्पर संमती दर्शवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन केले आणि 600MW खोलोंग्चू जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली.

नरेंद्र मोदींचे पाच महागडे दौरे

1. फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा (एप्रिल 9 - एप्रिल 17, 2015): रु 31,25,78,000

2. यूएसए (सप्टेंबर 21 - सप्टेंबर 28, 2019): रु 23,27,09,000

3. म्यानमार, ऑस्ट्रेलिया आणि फिजी (11 नोव्हेंबर - 20 नोव्हेंबर 2014): रु 22,58,65,000

4. ब्राझील (13 जुलै - 17 जुलै 2014): रु 20,35,48,000

5. आयर्लंड आणि यूएसए (सप्टेंबर 23 - सप्टेंबर 29, 2015): रु. 18,46,95,000

pmindia.gov.in नुसार, पीएम मोदींच्या विदेश दौऱ्यांवर खर्च केलेली रक्कमही मोठी आहे. 15 जून 2014 ते 15 नोव्हेंबर 2019 दरम्यान पीएम मोदींच्या परदेश दौऱ्यांवर बराच खर्च झाला.

मे 2014 ते नोव्हेंबर 2019 दरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी परदेश दौऱ्यांवर एकूण खर्च रु 3,59,04,52,763 (साडे तीनशे कोटी रु.) इतका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT