ISRO successfully conducts a long-duration test of the PS4 engine Dainik Gomantak
देश

ISRO Successfully Tests 3D-Printed Rocket Engine: इस्रोने रचला इतिहास, 3D प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO) ने ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग (AM) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेऊन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

Manish Jadhav

ISRO Successfully Tests 3D-Printed Rocket Engine: भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO) ने ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग (AM) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेऊन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. इस्रोकडून सांगण्यात आले की, नवीन इंजिन 97 टक्के कच्च्या मालाची बचत करते आणि उत्पादन वेळ 60 टक्क्यांनी कमी करते. 3D तंत्रज्ञानाच्या मदतीने 665 सेकंदांच्या वेळेत तयार केलेल्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी करण्यात आली. या लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी 9 मे रोजी इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स, महेंद्रगिरी येथून करण्यात आली, असे इस्रोने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, इस्रोने वापरलेले इंजिन हे PSLV च्या वरच्या टप्प्याचे PS4 इंजिन आहे. व्हॅक्यूम स्थितीत त्याचा थ्रस्ट 7.33 kN आहे. ISRO ने सांगितले की, PSLV च्या पहिल्या टप्प्यातील (PS4) रिॲक्शन कंट्रोल सिस्टम (RCM) मध्ये इंजिनचा वापर ऑक्सिडायझर म्हणून केला जातो आणि मोनो मिथाइल हायड्रॅझिनचा वापर प्रेशर-फेड मोडमध्ये केला जातो. जे बायप्रोपेलंटचे कम्पाउंड आहे. पारंपारिक उत्पादन प्रक्रियेसाठी 565 किलो फोर्जिंग्ज आणि शीटच्या तुलनेत इंजिनमध्ये केवळ 13.7 किलो मेटल पावडर वापरली गेली.

ISRO ची कमर्शियल विंग NewSpace India Limited (NSIL) ने शुक्रवारी PPP मोडमध्ये हेवी लिफ्ट रॉकेट लॉन्च व्हेईकल मार्क-3 (LVM3) विकसित करण्यासाठी आमंत्रित केले. जड उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी NSIL चा प्रतिवर्षी दोन रॉकेटच्या सध्याच्या क्षमतेच्या तुलनेत चार-सहा LVM 3 श्रेणी रॉकेटचे उत्पादन करण्याचा मानस आहे.

पीपीपी 14 वर्षांच्या कालावधीसाठी असेल

NSIL ने निवेदनात म्हटले की, NSIL ने संभाव्य बोलीदारांकडून रिक्वेस्ट फार क्वालिफिकेशन (RFQ) जारी केली आहे. NSIL ने सांगितले की, ते 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात LVM3 चे उत्पादन करण्यासाठी PPP मॉडेलद्वारे भारतीय उद्योगाशी भागीदारी करण्याचे पर्याय शोधत आहे. पीपीपी 14 वर्षांच्या कालावधीसाठी असेल.

प्रस्तावित कालावधीत सुमारे 60 ते 65 रॉकेट तयार केल्या जाण्याचा अंदाज आहे. LVM3 मध्ये सात यशस्वी प्रक्षेपणांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. श्रीहरिकोटा येथून दोन मोहिमांमध्ये वनवेबच्या 72 उपग्रहांचे प्रक्षेपण करुन रॉकेटने जागतिक कमर्शियल लॉन्चिंग मार्केटमध्ये पदार्पण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

SCROLL FOR NEXT