ISRO-NASA ची एकत्र रडार मोहीम! NISAR ठेवणार पृथ्वीवर होणाऱ्या बदलांवर लक्ष

ISRO-NASA: 2024 च्या सुरुवातीला NISAR मिशन लॉन्च होईल.
NASA - ISRO
NASA - ISRODainik Gomantak

ISRO-NASA: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि अमेरिकेची नासा एकत्रितपणे एक रडार मिशन लॉंच करत आहेत. या रडारला NISAR असे नाव देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या रडारचा हवामान बदलाचा आढावा घेण्यासाठी या मिशनचा उपयोग केला जाऊ शकतो.

या रडार मोहिमेमुळे पृथ्वीवर असलेली जंगले आणि पाणथळ जागा यांचे अधिक चांगल्या प्रकारे निरीक्षण केले जाऊ शकते. यामुळे कार्बन चक्राचा जंगले आणि पाणथळ जमिनींचा काय परिणाम होत आहे आणि त्यामुळे हवामान बदल कसे होत आहेत याची माहीती समोर येणार आहे.

2024 च्या सुरुवातीला NISAR मिशन लॉन्च होईल. दर 12 दिवसांनी संपूर्ण पृथ्वी आणि हिमनद्यांचे विश्लेषण करण्यासाठी NISAR रडार मिशन पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले जाईल. नासाने प्रसिद्धीपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून हवामान मोठ्या प्रकारचा बदल होताना दिसत असून त्याचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनात समोर आले आहेत. जगाच्या शाश्वत विकासासाठी संपूर्ण जगभरातील देश हवामान बदलावर उपाययोजना करण्यासाठी एकत्रितपणे काम करत असल्याचे दिसून येत आहेत.

NASA - ISRO
57 मुस्लिम देशांचे संघटन OIC ने भारताविरोधात पुन्हा ओकली गरळ, वक्तव्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जंगले आणि पाणथळ जागा महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे आपल्या वातावरणातील हरितगृह वायूंचे नियमन केले जाते. झाडे त्यांच्या खोडात कार्बन घेतात आणि कार्बन आर्द्र प्रदेशांच्या थरात आढळतो.

अशा परिस्थितीत, जंगलतोड आणि ओलसर जमीन नष्ट झाल्यामुळे पर्यावरणात किती वेगाने कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित होत आहे याची माहीती NISAR मुळे समजून घेण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाशी संबंधित शास्रज्ञ पॉल रोसेन यांनी दिलेल्या माहीतीनुसार, NISAR प्रकल्पावर बसवण्यात आलेल्या रडार तंत्रज्ञानामुळे पृथ्वीवरील जमीन आणि हिमनद्यांमधील बदल अधिक चांगल्या पद्धतीने ओळखता येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com