Israel Embassy
Israel Embassy  Dainik Gomantak
देश

Israel Embassy Blast: एनआयएने पुन्हा तक्रार दाखल करत तपासाला दिला वेग

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) ने दिल्ली मध्ये 29 जानेवारी रोजी इस्त्रायल दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बब्लास्ट तपासाची सूत्रे पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घेत तक्रार दाखल केली आहे. 29 जानेवारीला इस्त्रायल दूतावासाबाहेर हलक्या तिव्रतेचा आईईडी विस्फोट झाला होता. दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम मार्ग स्थीत दूतावासपासून 150 मी दूर असलेल्या भागामधील गाड्यांची जबरदस्त नुकसान झाले होते. एनआयए आगोदरपासनून या प्रकरणाचा तपास करत आहे. गृहमंत्रालयाने या प्रकरणासंबंधीचा तपास एनआयएकडे सोपविला होता. दूतावासाबाहेर झालेल्या ब्लास्टनंतर सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आलेल्या अज्ञात व्यक्तींची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी 10 लाख रुपयांच्या इनामाची घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, याआगोदर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी इस्त्रायल दूतावासाच्या आसपास असणाऱ्या 100 सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली. यामधील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन अज्ञात व्यक्तींना स्फोट होण्यापूर्वी त्या ठिकाणाहून जाताना पाहिले होते. मात्र या फुटेजनुसार अज्ञातांनी आपला चेहरा झाकला होता. त्यामधील एकाने जॅकेट घातले होते तर दुसऱ्याच्या हातामध्ये बॅग होती.

दिल्ली न्यायालयाने चार विद्यार्थ्यांचा जामीन मंजूर केला

मागील महिन्यात दिल्लीतील पाटियाला कोर्टाने करगिलमधून पकडण्यात आलेल्या नाजिर हुसैन (26), जुल्फीकार अली वजीर (25), अयाज हुसैन (28) आणि मुजम्मिल हुसैन (25) या चार विद्यार्थ्यांचा जामीन मंजूर केला होता. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते की, हे चारही विद्यार्थी लद्दाखमधील कारगिल जिल्ह्यातील थांगचे रहिवासी आहेत. मात्र दिल्ली पोलिसांकडून या चार विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जामीनाचा विरोध करत म्हटले की, हे प्रकरण महत्त्वपूर्ण आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी चौकशी करण्यासाठी रिमांडही मागितले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या विद्यार्थ्यांना धमकावत त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचण्याच्या आरोपाखाली गुन्हाही दाखल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT