corona vaccination Dainik Gomantak
देश

Corona Vaccine: कोविड लस घेतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो का? ICMR, NCDC चा अहवालातून केले स्पष्ट

ICMR, NCDC report on Corona Vaccine: आयसीएमआर, एनसीडीसीचा अहवाल : 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचे निरीक्षण

गोमंतक ऑनलाईन टीम

दिल्ली: कोविडच्या लाटेनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोविड लसीचा तो परिणाम असेल का, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे की, देशात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या अचानक मृत्यूंचा कोविड लसीशी थेट संबंध नाही.

हा अभ्यास १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांच्या अचानक मृत्यूवर आधारित आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. या अभ्यासातून भारताची कोविड लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची प्रकरणे दुर्मीळ आहेत. अचानक मृत्यूची इतर कारणे असू शकतात. यामध्ये अनुवंशशास्त्र, जीवनशैली, आधीच अस्तित्वात असलेले आजार आणि कोविडनंतरच्या गुंतागुंत यांचा समावेश आहे.

असे आहेत निष्कर्ष...

१) आयसीएम और आणि एनसीडीसी एकत्र काम करत आहेत. यासाठी दोन संशोधन अभ्यास केले जात आहेत. पहिला मागील डेटावर आधारित होता आणि दुसरा रिअल टाइम तपासणीशी संबंधित आहे.

२) आयसीएमआरच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेने (एनआयई) मे २०२३ ते ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७रुग्णालयांमध्ये हा अभ्यास केला.

३) ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान निरोगी दिसणान्या पण अचानक मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा डेटा त्यांनी तपासला. निकालांवरून असे दिसून आले की कोविड लस अचानक मृत्यूचा धोका वाढवत नाही.

४) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि आयसीएमआर यांच्या मदतीने झालेल्या अभ्यासात तरुण, प्रौढांच्या अचानक मृत्यूची कारणे शोधण्यात आली

५) अभ्यासातील सुरुवातीच्या विश्लेषणातून असे दिसून आले- या वयात अचानक मृत्यूचे प्रमुख कारण हृदयविकाराचा झटका किंवा मायोकार्डियल इन्फेक्शन होते.

६) गेल्या अनेक वर्षात अचानक मृत्यूच्या कारणांच्या पद्धतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. बहुतेक मृत्यू अनुवांशिक उत्परिवर्तनांमुळे होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: मोठी बातमी! गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

SCROLL FOR NEXT