IPS Satish Chandra
IPS Satish Chandra Dainik Gomantak
देश

इशरत जहाँ एनकाउंटर प्रकरणी IPS सतीश चंद्र यांची सेवेतून बडतर्फी, SIT चा होते भाग

दैनिक गोमन्तक

Ishrat Jahan Encounter Case: गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी सतीश चंद्र वर्मा यांना केंद्र सरकारने सेवेतून बडतर्फ केले आहे. सतीश वर्मा हे इशरत जहाँ हत्या प्रकरणातील SIT चा भाग होते. सतीश चंद्र वर्मा हे 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार होते, मात्र त्यापूर्वीच सरकारने त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. 1986 च्या बॅचचे अधिकारी वर्मा यांना विभागीय कारवाईच्या आधारे बडतर्फ करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

दरम्यान, केंद्र सरकारने (Central Government) दिल्ली उच्च न्यायालयाला 30 ऑगस्ट रोजी बडतर्फीच्या आदेशाची माहिती दिली, जिथे वर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध विभागीय कारवाईला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने सरकारला 19 सप्टेंबरपासून बडतर्फीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली होती. दुसरीकडे, वर्मा यांचे वकील सरीम नावेद म्हणाले होते की, ''आमच्याकडे अजूनही सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे."

दुसरीकडे, उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देताना वर्मा, सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कार्यरत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “उच्च न्यायालयाने केंद्राच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आहे, ज्यामध्ये मला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, याचिकाकर्ता 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अखिल भारतीय सेवांच्या वैधानिक नियमांनुसार हे मान्य नाही."

इशरत जहाँ प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून वर्मा यांनी 2011 मध्ये गुजरात (Gujarat) उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. जून 2004 मध्ये 19 वर्षीय इशरत जहाँची बनावट चकमकीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत आणखी दोन लोक मारले गेले होते. या तिघांचाही लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. इशरत जहाँ प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले तेव्हा, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्मा तपास पथकाशी संबंधित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT