IPL 2025 Dainik Gomantak
देश

IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे टॉप-5 संघ, Mumbai Indians कितव्या क्रमांकावर?

Top 5 IPL Teams Most Wins: आयपीएल २०२५ मध्ये, मुंबई इंडियन्स संघानं सुरुवातीचे काही सामने गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत सलग पाच सामने जिंकले. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ संघ कोणते आहेत? यावर एक नजर टाकूया.

Sameer Amunekar

आयपीएल २०२५ मध्ये, मुंबई इंडियन्स संघानं सुरुवातीचे काही सामने गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत सलग पाच सामने जिंकले. मुंबई सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी त्यांचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला, जिथे मुंबईने ५४ धावांनी विजय मिळवला.

मुंबई इंडियन्स संघाने या विजयासह आयपीएलमध्ये एक नवा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात १५० सामने जिंकणारा हा पहिला संघ ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ संघ कोणते आहेत? यावर एक नजर टाकूया.

मुंबई इंडियन्स

आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने इतिहास रचला. मुंबई संघ आयपीएलमध्ये १५० सामने जिंकणारा पहिला संघ बनला आहे. पाच वेळा विजेत्या मुंबईने २७१ पैकी १४८ सामने जिंकले आहेत. तर सुपर ओव्हरमध्ये दोन सामने जिंकले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. आयपीएलमध्ये सीएसकेने २४८ पैकी १४० सामने जिंकले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स

तीन वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत २६१ सामने खेळले आहेत ज्यापैकी १३३ सामने जिंकले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीने २६६ पैकी १२८ सामने जिंकले आहेत. संघात अनेक स्टार खेळाडू असूनही, या फ्रँचायझीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही.

दिल्ली कॅपिटल्स

या यादीत दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या क्रमांकावर आहे. डीसीने आतापर्यंत आयपीएलमध्ये २६१ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी ११७ सामने जिंकले आहेत. दिल्लीला आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT