International Day of Women and Girls in Science
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी या क्षेत्रांमधील महिला आणि मुलींच्या महत्त्वपूर्ण कामिगरीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवण्यासाठी 11 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस साजरा करण्यात येतो.
युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांनी 11 फेब्रुवारी हा दिवस "आंतरराष्ट्रीय महिला आणि मुलींसाठी विज्ञान दिन" म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून 11 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस साजरा केला जात आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचं योगदान अधोरेखित करणं आणि विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं हे या दिवसाचा उद्देश आहे.
विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात महिलांनी मोठं कार्य केलं आहे, परंतु अनेकदा त्यांचं योगदान दुर्लक्षित राहतं. या दिवसाच्या निमित्तानं महिला वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो. महिलांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रात अधिक संधी मिळाव्यात म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे.
शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करणं हा एक उद्देश आहे. हा दिवस जागतिक स्तरावर महिलांना विज्ञान क्षेत्रात संधी मिळण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो.
विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात महिलांचा समान सहभाग आणि योगदान वाढवण्यासाठी प्रेरणा देणे.
समाजात महिला वैज्ञानिकांची भूमिका आणि योगदान अधोरेखित करणे.
विज्ञान क्षेत्रातील महिला वैज्ञानिकांना अधिक संधी आणि पाठिंबा मिळावा यासाठी जनजागृती करणे.
यंदा महिला आणि मुलींचा 10वा आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जात आहे. यावर्षीची थिम ‘Unpacking STEM careers: Her Voice in Science’ म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील करिअर संधी उलगडणे आणि यामध्ये महिलांचा योगदान अधोरेखित करणं आहे.
कल्पना चावला: कल्पना चावला या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला होत्या. त्यांचा जन्म भारतात झाला, पण अमेरिकेत NASA मध्ये अंतराळवीर म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे जीवन प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
असिमा चटर्जी: या भारतातील एक नामांकित रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्या विशेषतः औषधनिर्मिती आणि वनस्पतिज औषधशास्त्र क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे संशोधन मलेरिया, कर्करोग, आणि मिर्गीच्या उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरले.
टेसी थॉमस: टेसी थॉमस या भारताच्या पहिल्या महिला क्षेपणास्त्र वैज्ञानिक आहेत. त्यांना "मिसाईल वूमन ऑफ इंडिया" म्हणून ओळखलं जातं. त्या अग्नि क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या प्रमुख वैज्ञानिक होत्या आणि त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे.
मॅरी क्युरी: मॅरी क्युरी या एक महान शास्त्रज्ञ होत्या. त्यांना पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्या दोन वेगवेगळ्या विज्ञानांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.