Manish Jadhav
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण मोठ्याप्रमाणावर जंक फूडचे सेवन करत आहोत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल, शरीराची हालचाल न करणं यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना लोकांना करावा लागत आहे.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पोटाचे, पचनाचे विकार अशा अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. यामुळे शुगर, बिपी असे आजार होतात. याचा थेट परिणाम किडनीवर होतो.
त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना किडनीसंबंधीच्या समस्यांचा त्रास वाढला आहे. तसेच शरीरातील यूरिक अॅसिड वाढणे, किडनी स्टोन आणि इतर आजारांचा धोकाही वाढत चालला आहे.
किडनी संबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी किंवा त्यांना निरोगी ठेवण्यासाठी एक खास ग्रीन चटणी बणवून तुम्ही खाऊ शकता.
कोथिंबीर, पुदीना, लसूण, आलं आणि लिंबू यांपासून तुम्ही ग्रीन चटणी बनवू शकता. किडनीच्या आरोग्यासाठी ही चटणी खूप फायदेशीर आहे.
या चटणीमधील साहित्यांमध्ये डाययूरेटिक गुण असतात जे यूरिक अॅसिड लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत करतात.