Women's Day 2025 Dainik Gomantak
देश

Women's Day 2025: सरप्राईज, गेम्स आणि भरपूर धमाल! ऑफिसमध्ये महिला दिन साजरा करा जल्लोषात; पाहा या सोप्या युक्त्या

International Women’s Day 2025 Celebration Ideas: दरवर्षी जगभरात 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कार्याचा जागर करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजता करतो.

Manish Jadhav

International Women’s Day 2025 Celebration Ideas for Office

दरवर्षी जगभरात 8 मार्च हा दिवस 'महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कार्याचा जागर करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आपण फुल न फुलाची पाकळी देऊन तरी स्त्रीचा सन्मान करता यावा म्हणून प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील स्त्रीला काही ना काही खास देत असतो. आजच्या काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. विशेष म्हणजे, समाजाच्या नियमांना मोडून आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिवस

महिला दिनाचा (8 मार्च) उद्देश महिलांचा संघर्ष, त्यांचे हक्क आणि समाजातील त्यांची भूमिका याबद्दल जागरुकता वाढवणे हा आहे. दरम्यान, जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये हा दिवस खास आणि संस्मरणीय बनवायचा असेल, तर आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून काही सर्जनशील कल्पना सुचवणार आहोत.

1. सरप्राईज गिफ्ट्स

जेव्हा 8 मार्चच्या दिवशी तुमच्या सहकारी महिला कर्मचारी ऑफिसमध्ये येतील तेव्हा त्यांना फुले, चॉकलेट किंवा आकर्षक गिफ्ट्स देवून सुखद धक्का देवू शकता. त्यांच्या मेहनतीचे आणि योगदानाचे कौतुक करणारी एक चिठ्ठी त्यांच्या डेस्कवर ठेवा. तुमची ही छोटीशी कृती देखील त्यांचा हा दिवस खास बनवू शकते.

2. 'वुमन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करा

ऑफिसमध्ये (Office) काम करुन नवीन उंची गाठलेल्या महिलांना या दिवशी 'वुमन ऑफ द इयर' किंवा 'सुपरवुमन' पुरस्कार देऊन त्यांच्या कठोर परिश्रमाचे तुम्ही कौतुक करु शकता. यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच पण इतर महिलांनाही देखील प्रेरणा मिळेल.

3. मोटिव्हेशनल स्पीच आणि इंटरएक्टिव सेशन

या खास दिवशी महिलांचे हक्क, स्वावलंबन आणि यश याबद्दल बोलू शकणाऱ्या प्रेरणादायी महिला उद्योजिका, नेत्या किंवा प्रेरक वक्त्याला आमंत्रित करा. तसेच, कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना त्यांचे अनुभव आणि कल्पना शेअर करण्याची संधी द्या, जेणेकरुन प्रत्येकजण एकमेकांकडून काहीतरी नवीन शिकू शकेल.

4. डेकोरेशन

या दिवशी तुम्ही ऑफिस खास डोकेरेट करु शकता. महिला दिनाचे प्रतीकात्मक रंग असलेल्या गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या थीमवर ऑफिस डेकोरेट करा. भिंतींवर प्रेरणादायी कोट्स आणि पोस्टर्स लावा. ऑफिस अशा प्रकारे सजवा की सर्वांना या दिवसाचे महत्व समजेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT