Asani Cyclone Dainik Gomantak
देश

Asani Cyclone: 'असनी' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा मिदनापूर आणि झारग्राम दौरा लांबणीवर

Asani Cyclone: चक्रीवादळ 10 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता असल्याने बंगालमध्ये 'हाय अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

'असनी' नावाचे चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून 940 किमी आणि ओडिशातील पुरीपासून 1000 किमी अंतरावर असल्याचे माहिती मिळत आहे. चक्रीवादळ 10 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता असून बंगालमध्ये 'हाय अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, चक्रीवादळाची पूर्वकल्पना लक्षात घेता ममता बॅनर्जी यांनी त्यांचा जिल्हा दौरा पुढे ढकलला आहे.

* चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज
बंगालच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. येथील एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड आणि नेव्ही अलर्टवर आहेत. बंगालमधील किनारी जिल्ह्यांच्या प्रत्येक भागात आणि मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. चक्रीवादळासाठी 5 आपत्कालीन प्रतिसाद पथके देखील तयार आहेत.

* ममता बॅनर्जींनी जिल्हा दौरा पुढे ढकलला
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी (Mamata Banerjee) जिल्हा दौरा पुढे ढकलला आहे. टीएमसीचे सरचिटणीस कुणाल घोष यांनी सांगितले, 'असानी' वादळाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम मिदनापूर आणि झारग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा 3 दिवसांचा कार्यक्रम 10, 11 आणि 12 मे ते 17, 18 आणि 19 मे असा बदल करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानुसार मंगळवारपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या किनारी जिल्ह्यांसह राज्याच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना 10 मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात तसेच ओडिशा किनारपट्टीवर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ओडिशा किनारपट्टीलगतच्या समुद्रामध्ये 9 मे आणि 10 मे रोजी बदल दिसून येतील. दरम्यान, 10 मे रोजी समुद्रातील वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT