INS Vikrant Dainik Gomantak
देश

Indian Navy: भारतीय नौदलही Action मोडमध्ये; पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला, डागले 10 मिसाईल

India Pakistan War: आयएनएस विक्रांत आणि कोलकत्ता क्लास डिस्ट्रॉयरवरुन पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये आता हल्ला -प्रतिहल्ल्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने भारतातील विविध ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची, बहावलपूर आणि लाहोर येथे हवाई हल्ला केल्याची माहिती मिळत असताना, आता भारतीय नौदल देखील Action Mode मध्ये आले असून, भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यात आला आहे.

वेस्टर्न नेवल कंमाडच्या आयएनएस विक्रांत आणि कोलकत्ता क्लास डिस्ट्रॉयरवरुन पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दहापेक्षा अधिक हल्ले करण्यात आले आहेत. जमीनसह आता हवाई हल्ले करुन पाकिस्तानची कोंडी सुरु आहे.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने १५ दिवसांत ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानमध्ये कार्यरत असणारे नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यात जवळपास १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी (०८ मे) रात्री जम्मू काश्मीर, जैसलमेर, पठाणकोट, अकनूर, पूंछ या ठिकाणी ड्रोन हल्ला केला. भारतीय सुरक्षा प्रणाली एस-४०० यामुळे भारताने आठ ड्रोन नष्ट करण्यात आले.

पाकिस्तानकडून सीमेपलिकडून गोळीबार सुरुच असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या कारवाईला भारताने चोख प्रत्युत्तर देत इस्लामाबाद, कराची, लाहोर आणि बहावलपूर येथे हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ला केला आहे.

भारतीने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे हल्ला केला असून, राजधानी हल्ल्याने हादरली आहे. तसेच, लाहोरमध्ये देखील भारताने हवाई हल्ला केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. जमीन, हवा आणि पाणी अशा तिन्ही ठिकाणांवरुन भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलत असून, परिस्थितीची माहिती दिली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून दोन्ही देशांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly Session Live: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर!

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

New Dress Code: हाफ-स्लीव्ह, लेगिंग्सला बंदी! भारताशेजारील 'या' देशात महिला-मुलींसाठी नवा ड्रेस कोड; तालिबानी फतवा जारी

SCROLL FOR NEXT