Crime News Dainik Gomantak
देश

तुरुंग अधिकाऱ्याची क्रूरता! लोखंडी रॉडने कैद्याच्या पाठीवर लिहिले 'गँगस्टर' Video Viral

Punjab Crime News: पंजाबमधील फिरोजपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Punjab: पंजाबमधील फिरोजपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहाच्या सुरक्षा रक्षकाने गरम लोखंडी रॉडने पाठीवर 'गँगस्टर' लिहिल्याचा दावा एका कैद्याने केला आहे. कैदी तरसेम सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण पंजाबमधील फिरोजपूर तुरुंगातील असल्याचे सांगितले जात आहे. कैदी तरसेम सिंग 2017 पासून फिरोजपूर तुरुंगात दरोड्याच्या गुन्ह्यात बंद आहे. तरसेम हा ढिलवण (Kapurthala) येथील रहिवासी आहे. येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याने कारागृहाच्या सुरक्षाकडून छळ केल्याचा आरोप केला आहे. पाठीवर गरम लोखंडी रॉडने पंजाबीत 'गुंड' हा शब्द लिहिला.

वृत्तानुसार, तरसेम बुधवारी कपूरथला न्यायालयात हजर झाला होता, जिथे त्याने त्याचा शर्ट काढून तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप केला होता. आपल्या जीवाला धोका असल्याचा दावाही त्यांनी केला. न्यायमूर्ती राकेश कुमार यांनी कैद्याला वैद्यकीय तपासणीसाठी कपूरथळा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Hospital) नेण्याचे आणि 20 ऑगस्टला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. जे आवश्यक असेल ते केले जाईल, असे कपूरथलाचे एसएमओ डॉ. संदीप धवन यांनी सांगितले.

दरम्यान, पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. दुसरीकडे, कारागृह प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण काही दिवसांपूर्वीचे असून, तुरुंग प्रशासनाला टार्गेट करण्यासाठी तरसेमनेच दुसऱ्या कैद्याच्या साहय्याने आपल्या पाठीवर हे लिहून घेतल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्याबद्दल कैद्याने यापूर्वी माफीही मागितली होती, परंतु काल ​​तो कोर्टात गेला तेव्हा त्याने खोटे आरोप केले, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तसेच, तरसेम सिंगच्या पालकांनी या प्रकरणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बुधवारी झालेल्या सुनावणीलाही ते उपस्थित होते. त्यांनी यावेळी सांगितले की, 'आमच्या मुलावर पोलिसांनी (Police) इतर अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्येही चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले होते. आमच्या मुलाला योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT