Punjab: पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, मुसेवाला प्रकरणातील शूटर्स चकमकीत ठार

Punjab Police: पंजाब पोलिसांनी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोन्ही शूटर्संना चकमकीत ठार केले आहे. यादरम्यान पंजाब पोलिसांचे तीन कर्मचारी जखमी झाले.
Punjab Police
Punjab PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Punjab Police: पंजाब पोलिसांनी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोन्ही शूटर्संना चकमकीत ठार केले आहे. यादरम्यान पंजाब पोलिसांचे तीन कर्मचारी जखमी झाले.

दरम्यान, सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये जगरुपसिंग रुपा आणि मनप्रीत सिंग उर्फ ​​मन्नू कुसा हे शूटर सहभागी होते. हे दोघेही मुसेवालाची हत्या करुन फरार झाले होते. विशेष म्हणजे, हे दोघेही भकना गावात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर आज पंजाब (Punjab) पोलिसांनी (Police) परिसराची नाकेबंदी केली. यानंतर चकमक सुरु झाली. सुमारे तीन तास चाललेल्या ऑपरेशननंतर दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.

Punjab Police
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा, पाकिस्तान कनेक्शन आले समोर

दुसरीकडे, शुभदीप सिंग सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी मानसा गावात काही लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 21 जून रोजी रुपा आणि कुसा मोगा जिल्ह्यातील सामलसरमध्ये असल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी सहा हल्लेखोरांना ओळखले आहे, जे हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोन मॉड्यूलचा भाग होते.

याशिवाय, दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने यापूर्वी प्रियव्रत फौजी, कशिश आणि अंकित सिरसा या तीन शूटर्संना अटक केली होती. रुपा आणि कुसा हे दुसऱ्या मॉड्यूलचे भाग होते. कुसाने मुसेवाला यांच्यावर गोळी झाडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Girl Accidentally Drinks Acid Kanpur
Lieutenant General NS Raja Subramani New CDS
8th Pay Commission
Man Cuts Private Part Temple
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com