Bomb Threat Dainik Gomantak
देश

Bomb Threat: दिल्ली स्फोटानंतर 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, इंडिगो एअरलाईन्सला ई-मेल आल्याने खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

International Airport Bomb Threat: देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची भंबेरी उडाली आहे.

Manish Jadhav

International Airport Bomb Threat: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा तपास सुरु असतानाच, आता देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची भंबेरी उडाली आहे. बुधवारी (12 नोव्हेंबर) दुपारी 3:30 वाजता इंडिगो एअरलाईन्सला ई-मेलद्वारे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. या धमकीच्या मेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या प्रमुख विमानतळांचा उल्लेख होता. या मेलनंतर तातडीने तपास सुरु करण्यात आला.

इंडिगोला मिळालेली धमकी 'अफवा' ठरली

धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सर्व ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि तातडीने तपासणी मोहीम राबवण्यात आली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर बॉम्ब असल्याची माहिती सायंकाळी 4 वाजता अग्निशमन दलाला मिळाली. तथापि, घटनास्थळाची कसून तपासणी केल्यानंतर ही माहिती अफवा असल्याचे सिद्ध झाले.

इंडिगोच्या तक्रार पोर्टलवर आलेल्या या ई-मेलमध्ये दिल्ली, चेन्नई आणि गोवासह अनेक विमानतळांचा उल्लेख होता. खबरदारी म्हणून, या सर्व ठिकाणी तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. ई-मेल नेमका कोणी आणि कोठून पाठवला, याबाबत अजूनही अस्पष्टता आहे.

मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्ब धमकी

इंडिगोला धमकी मिळाल्यानंतर काही तासांतच, मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानालाही बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. ही धमकी विमानाच्या उड्डाणादरम्यान मिळाल्याने मोठा गोंधळ उडाला. धमकी मिळताच लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करुन त्याला त्वरित आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले. सर्व प्रवाशांना विमानाबाहेर सुरक्षितपणे काढण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने विमानाची कसून तपासणी केली. तपासणीमध्ये आत्तापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळलेला नाही.

एअर इंडिया एक्सप्रेसचे अधिकृत निवेदन

या घटनेनंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन जारी केले. निवेदनानुसार, “वाराणसीला जाणाऱ्या आमच्या एका विमानाला सुरक्षा संबंधित धमकी मिळाली. प्रोटोकॉलनुसार, सरकारने नियुक्त केलेल्या बॉम्ब धोका मूल्यांकन समितीला त्वरित सूचित करण्यात आले आणि सर्व आवश्यक सुरक्षा उपाय तात्काळ सुरु केले गेले. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. सर्व अनिवार्य सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमान पुन्हा उड्डाण करेल.”

दिल्लीतील स्फोट आणि त्यानंतर विमानतळांना आलेल्या या धमकीच्या मालिकेने देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, या धमकी देणाऱ्यांचा शोध घेणे सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

Horoscope: लक्ष्मी मातेची कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभ आणि सुखाची बातमी, वाचा भविष्य!

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

SCROLL FOR NEXT