Indigo Flight Diverted twitter
देश

Indigo Flight Diverted: दिल्लीहून वडोदरा जाणाऱ्या इंडिगो विमानाचे जयपूरला इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

दिल्लीहून वडोदरा जाणाऱ्या इंडिगो विमानाचे जयपूरला इमर्जन्सी करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

दिल्लीहून वडोदरा जाणाऱ्या इंडिगो विमानात गुरुवारी काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. या प्रकरणात सध्या विमानात सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. इमर्जन्सी लँडिंगबाबत काही गोंधळ उडाला असला तरी क्रूचे सदस्य सुरक्षित आहेत. (indigo plane going delhi vadodara got technical fault emergency landing jaipur news)

विमानात काही तांत्रिक बिघाड होता, त्यानंतर खबरदारी म्हणून बिमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अलीकडेच स्पाइसजेटच्या विमानात 18 दिवसांत तांत्रिक बिघाड झाल्याच्या आठ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. ज्यावर विमान वाहतूक नियामक DGCA ने कारवाई केली आणि कंपनीला नोटीस बजावली. यावर स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांचे विधान उघड झाले. अजय सिंह म्हणतात की, स्पाईसजेट उड्डाण करण्यापूर्वी विमानाच्या तपासणीची प्रक्रिया आणखी मजबूत करेल आणि त्यावर अधिक काळजी घेतली जाईल.

* कमी पगारामुळे IndiGo चे अनेक कर्मचारी एकत्र रजेवर गेले

अलीकडेच इंडिगो एअरलाइन्सचे अनेक कर्मचारी कमी पगारामुळे एकत्र रजेवर गेले होते. त्यामुळे अनेक उड्डाणे उशीरा झाले. मोठ्या संख्येने इंडिगो क्रू मेंबर्सनी प्रकृतीचे कारण सांगून रजा घेतली होती. 2 जुलै रोजी, इंडिगोच्या सुमारे 55 टक्के देशांतर्गत उड्डाणांना उशीर झाला होता. कंपनीचे पायलट, केबिन क्रू आणि तंत्रज्ञ अचानक सामूहिक रजेवर गेल्याच्या जवळपास 10 दिवसांनी इंडिगोचे पहिले विधान आले आहे.

कंपनीने म्हटले आहे की, 'एक जबाबदार नियोक्ता म्हणून, इंडिगो कोणत्याही समस्या किंवा तक्रारींसाठी आपल्या कर्मचाऱ्यांशी सतत संवाद साधत असते. गेल्या दोन वर्षांपासून विमान वाहतूक अनेक समस्यांना सामोरे जात आहे. व्यवसायात सुधारणा होत असताना आम्ही काही कर्मचार्‍यांच्या वेतन समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही या प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांचा अभिप्राय घेणे सुरू ठेवू. दरम्यान, आमचे कामकाज सामान्य आहे. आम्ही आमच्या नेटवर्कमध्ये अनेक नवीन गंतव्यस्थाने जोडत आहोत आणि भारत आणि जगभरातील ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT