Indigo Flight Dainik Gomantak
देश

Indigo Flight: अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगोचे विमान भरकटले, पोहोचले थेट पाकिस्तानात!

Indigo Flight: अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान पाकिस्तानातील लाहोरजवळ भरकटले.

Manish Jadhav

Indigo Flight: अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान पाकिस्तानातील लाहोरजवळ भरकटले. सुमारे 30 मिनिटांनंतर भारतीय हवाई हद्दीत परत येण्यापूर्वी गुजरानवाला येथे उड्डाण केले. इंडिगोने ही माहिती दिली आहे.

यामागचे कारण खराब हवामान असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री 8 च्या सुमारास विमान पुन्हा भारतीय हवाई हद्दीत पोहोचल्याचे सांगण्यात आले. या माहितीनंतर एकच खळबळ उडाली.

फ्लाइट रडारनुसार, भारतीय विमान शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता लाहोरच्या उत्तरेला 454 नॉट्सच्या गतीने दाखल झाले आणि रात्री 8:01 वाजता भारतीय हद्दीत परतले. पाक नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (CAA) चे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे असामान्य नव्हते, कारण खराब हवामान परिस्थिती "आंतरराष्ट्रीय स्तरावर परवानगी" होती.

दरम्यान, सीएएकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळांवर दृश्यमानता कमी असल्याने अनेक उड्डाणे वळवण्यात आली तर अनेक उशिराने धावत आहेत.

तसेच, CAA च्या प्रवक्त्याने लाहोरसाठी हवामानाचा इशारा रात्री 11:30 पर्यंत वाढवला. अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी दृश्यमानता 5,000 मीटर होती. पाकिस्तानमध्ये शनिवारी एक भयानक वादळ आले, ज्यामध्ये झाडेही उन्मळून पडली आणि 28 लोकांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानमधील (Pakistan) मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाहोरला जाणारी अनेक उड्डाणे खराब हवामानामुळे इस्लामाबादकडे वळवण्यात आली.

दरम्यान, अबुधाबीहून इस्लामाबादला (Islamabad) जाणारे पीआयएचे फ्लाइट मुलतानकडे वळवण्यात आले. जेद्दाह-लाहोर फ्लाइटही मुलतानच्या दिशेने वळवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT