पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील भाजपावर निशाणा साधला आहे. देशात वाढत्या सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी भाष्य केलं आहे. देशात निर्माण झालेला सामाजिक तणाव वेळीच थांबवला नाही, तर भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा भीषण होईल, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. (India's position will be worse than Sri Lanka's - Mehbooba Mufti )
देशात सद्या मशिदीवरील भोंगे, देशद्रोह कायद्याचा वापर, अतिक्रमणांच्या कारवाया आदी मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. आपला देश आता गरिबीच्या बाबतीत बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळच्या मागे पडला आहे. या संबंधित मुद्द्यांवरून पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपावर निशाणा साधला आहे.
तसेच सामाजिक तणाव वेळीच थांबवला नाही, तर भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा भीषण होईल असं त्या म्हणाल्या तसेच “सध्या देशात अल्पसंख्यांकावर विशेषत: मुस्लिमांवर हल्ले वाढले आहेत. अल्पसंख्याकांना प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. ती बदलणे आवश्यक आहे. अशीच स्थिती काश्मीरमध्ये असुन काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करणं आवश्यक आहे. त्यांची घरं पाडली जात आहेत. असे ही म्हणाल्या.
दुसरीकडे, भाजप सरकारकडे जनतेला देण्यासारखं काहीच नाही, असा टोलाही पीडीपी प्रमुखांनी लगावला आहे. बेरोजगारी, महागाई या सगळ्यात वाढ होत आहे. मात्र मला आशा आहे की, सध्या देशातील भाजपा सरकार श्रीलंकेच्या स्थितीतून योग्य धडा घेईल. आणि ते ज्या दिशेनं जाऊ इच्छित आहेत, त्या दिशेनं जाणं ते थांबवतील. देशात जो सामाजिक तणाव वाढवला ते थांबवतील,” असंही त्या यावेळी म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.