BrahMos Missile Dainik Gomantak
देश

BrahMos Missile: 'ब्रह्मोस'चा जलवा! 'हे' 17 देश खरेदी करणार भारताचं सुपरसॉनिक मिसाईल; पाकड्यांची मस्ती जिरवण्यात बजावली भूमिका

BrahMos Missile Export: भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यात 17 देशांनी रस दाखवला आहे, त्यापैकी इंडोनेशियाने त्याचे अ‍ॅडव्हान्स व्हर्जन खरेदी करण्यात रस दाखवला आहे. या क्षेपणास्त्राने पाकिस्तानचा कणा मोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Manish Jadhav

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धबंदीमुळे काहीसा निवळला. भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानचा कणा मोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या क्षेपणास्त्राने पाकड्यांचे कंबरडे मोडले. 100 हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात या क्षेपणास्त्राने महत्त्वाची भूमिका निभावली. ब्रह्मोसने पाकिस्तानचे पाच हवाई तळही उडवून लावले. आता जगातील देशांमध्ये हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. त्यांना हे क्षेपणास्त्र खरेदी करुन भारतासारखी त्यांची संरक्षण शक्ती मजबूत करायची आहे.

पाकड्यांची मस्ती जिरवली

दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली, त्यानंतर भारतीय सैन्याने 7 आणि 8 मे रोजी रात्री या क्षेपणास्त्राने पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यानंतर 8 आणि 9 मे रोजी रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या (India) हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला. यानंतर, भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या मदतीने त्यांचे 5 हवाई तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र कसे आहे?

ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने लक्ष्यावर मारा करते. तसेच, हे क्षेपणास्त्र सेल्फ गाइडन्स असून आपले लक्ष्य शोधून ते नष्ट करते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 500 ते 800 किमी एवढी आहे. हे क्षेपणास्त्र 300 किलो स्फोटके वाहून नेऊ शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि रशियाच्या NPO माशिनोस्ट्रोयेनिया यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित करण्यात आले आहे.

कोणते देश ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करु इच्छितात?

भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यात 17 देशांनी रस दाखवला आहे, त्यापैकी इंडोनेशियाने (Indonesia) त्याचे अ‍ॅडव्हान्स व्हर्जन खरेदी करण्यात रस दाखवला आहे. हा 200 ते 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा करार असेल. यासोबतच, व्हिएतनामला हे क्षेपणास्त्र त्यांच्या सैन्यासाठी 700 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करायचे आहे.

याशिवाय, मलेशिया त्यांच्या सुखोई एसयू 30 किमी लढाऊ विमान आणि केदाह श्रेणीच्या युद्धनौकांसाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करु इच्छित आहे. त्याचवेळी, थायलंड, सिंगापूर, ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, इजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान, दक्षिण आफ्रिका आणि बल्गेरिया यासारख्या देशांसोबत ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठीच्या वाटाघाटी जवळजवळ अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid Goa: गोव्यात ‘ईडी’ची मोठी कारवाई! अनेकांचे धाबे दणाणले, 12 ठिकाणी छापेमारी

Kushagra Jain Case: ..माझ्या मुलग्याचा मृत्यू झालाच कसा? 'कुशाग्र'च्या वडिलांनी लिहिले CM सावंतांना पत्र; विषबाधेचा संशय व्यक्त

Rashi Bhavishya 10 September 2025: कामात जबाबदाऱ्या वाढतील, आर्थिक व्यवहार जपून करा; महत्वाच्या निर्णयात घाई करू नका

Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

SCROLL FOR NEXT