Indian Supersonic Missile: शत्रूची दाणादाण उडवतं भारताचं 'हे' क्षेपणास्त्र, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Manish Jadhav

ब्राह्मोस

शत्रूची धडकी भरवणारे क्षेपणास्त्र म्हणून ब्राह्मोसकडे पाहिले जाते. ब्राह्मोस हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असणाऱ्या क्षेपणास्त्राला स्वनातील क्षेपणास्त्र म्हटले जाते.

BrahMos missile | Dainik Gomantak

वेग

ब्राह्मोसचा वेग मॅक 2.5 ते 2.8 (अंदाजे 3430 किलोमीटर प्रतितास) आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान आणि जमीन येथून वापरता येते.

BrahMos missile | Dainik Gomantak

निर्मिती

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियाची ‘एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया’ संस्था या दोघांच्या संयुक्त उपक्रमाने ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’द्वारे त्याची निर्मिती करण्यात आली.

BrahMos missile | Dainik Gomantak

ब्राह्मोस नाव कसे दिले?

ब्राह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा, आणि रशियातील मोस्कवा या नद्यांच्या आद्याक्षराने बनले आहे.

BrahMos missile | Dainik Gomantak

हलक्या वजनाचे ब्राह्मोस

हलक्या वजनाची तीन ब्राह्मोस क्षेपणास्त्रे ‘सुखोई’त वापरता येतात. मात्र सध्या एकच क्षेपणास्त्र वापरले येते.

BrahMos missile | Dainik Gomantak

हवामान बदल

ब्राह्मोस दिवसा, रात्री आणि कोणत्याही हवामानातील बदलांमध्ये त्याचा पूर्ण क्षमतेने वापर केला जातो.

BrahMos missile | Dainik Gomantak
आणखी बघा