Education }?
देश

Education: भारतीय विद्यार्थ्यांचा कल करिअर केंद्रित शिक्षणाकडे, लंडनमधील विद्यापीठाचा परदेशातील शिक्षणाबाबत अहवाल

indian students career oriented education: लंडनमधील एका विद्यापीठाच्या एका नव्या अहवालानुसार ९७ टक्के भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण निवडताना थेट करिअरशी जोडणाऱ्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: लंडनमधील एका विद्यापीठाच्या एका नव्या अहवालानुसार ९७ टक्के भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण निवडताना थेट करिअरशी जोडणाऱ्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. रोजगारक्षमता, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि वास्तविक जीवनातील कौशल्ये ही परदेशात शिक्षणसंस्थेची निवड करताना अत्यावश्यक घटक आहेत, असे विद्यार्थ्यांचे मत आहे. नोकरीसाठी थेट मदत करणाऱ्या अभ्यासक्रमांना सध्याच्या पिढीकडून मोठी मागणी आहे, असेही अहवालातून समोर आले आहे.

लंडनमधील सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटी आणि अर्लिंग्टन रिसर्चने केलेल्या अभ्यासात असे आढळले की भारतीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे महत्त्व केवळ वर्गातील तासांपुरते किंवा पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नाही. व्यावहारिक कौशल्ये, अनुभवाधारित शिक्षण आणि करिअर घडविण्याची तयारी हेही तितकेच महत्त्वाचे घटक असल्याचे या सर्वेक्षणात नमूद झाले आहे.

‘व्हॅल्यू ऑफ स्टडिंग ॲब्रोड’ या नव्या अहवालानुसार, परदेशात शिक्षणासाठी संस्था निवडताना ९७ टक्के भारतीय विद्यार्थ्यांसाठी रोजगार क्षमतेच्या संधी, कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि वास्तव जगातील कौशल्ये अत्यावश्यक मानली जात आहेत.

अहवालात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाबाबत भारतीय विद्यार्थ्यांच्या अपेक्षांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत आहे आ सर्व देशांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थी उपयोजित शिक्षण, तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक वर्तनाला त्यांच्या शिक्षणाचा अत्यावश्यक भाग मानतात, असे निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आले आहेत. जागतिक पातळीवर ५६ टक्के विद्यार्थ्यांनी रोजगारक्षमतेला शिक्षण निवडीतील पहिल्या तीन प्राधान्यांमध्ये स्थान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

Goa Beach Wedding: परवानगी नसताना घातला मांडव, बीच वेडिंगच्या नादात 1 लाखांचा दंड, गोव्यात घडला अजब प्रकार; वाचा

'अवामी लीग'ला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र! हसीनांच्या मृत्युदंडामागे राजकीय सूड? - संपादकीय

क्रिकेट जगतात खळबळ! रोहित-विराटच्या निवृत्तीचा 'डाव' गंभीरने रचला? पुजारानंतर आणखी एका खेळाडूचा 'हल्लाबोल'

Goa Politics: खरी कुजबुज; 'त्या' भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद!

SCROLL FOR NEXT