Indian Railway Recruitment 2022
Indian Railway Recruitment 2022 Dainik Gomantak
देश

Indian Railway Recruitment 2022: परीक्षेशिवाय मिळवा नोकरी आणि 43000 पेक्षा जास्त पगार

दैनिक गोमन्तक

Indian Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत गट C पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी वॉक-इन-मुलाखत (Indian Railway) 20 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

याशिवाय, उमेदवार https://secr.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे इंडियन रेल्वे रिक्रूटमेंट 2022 , तुम्ही अधिकृत अधिसूचनादेखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 75 पदे भरली जातील.

महत्वाच्या तारखा

स्टाफ नर्स: 20, 21, जानेवारी 2022

फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ आणि ड्रेसर: 22 जानेवारी 2022

लॅब अधीक्षक, लॅब असिस्टंट, दंत आरोग्यतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओ-कम-स्पीच थेरपिस्ट, रिफ्रॅक्शनिस्ट: 24 जानेवारी, 2022

रिक्त जागांचा तपशील

स्टाफ नर्स: 49 जागा

फार्मासिस्ट: 4 जागा

ड्रेसर: 6 जागा

क्ष-किरण तंत्रज्ञ: 3 जागा

दंत आरोग्यतज्ज्ञ: 1 जागा

लॅब अधीक्षक: 2 जागा

लॅब असिस्टंट: 7 जागा

फिजिओथेरपिस्ट: 1 जागा

ऑडिओ-कम-स्पीच थेरपिस्ट: 1 जागा

पात्रता निकष

अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे संबधित विषयाचे ज्ञान असावे आणि पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

वॉक-इन मुलाखतीच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Scarety : आसगाव, हणजूण परिसरात पाणीटंचाई; टँकरवाले मालामाल

Water Shortage : पाणी प्रश्‍नावरून साकोर्ड्यात संताप; विहिरी आटल्याने पंप बंद

What is Chabahar Port: काय आहे चाबहार करार? भारत आणि इराणमधील कराराने चीन-पाकिस्तान टेन्शनमध्ये; वाचा संपूर्ण प्रकरण

Bodgeshwar Temple Theft : चोरांच्‍या टोळीला आणले गोव्‍यात; नऊ दिवसांची कोठडी

Sattari Rain : सत्तरीला पावसाचा जोरदार तडाखा; वाहनचालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT