INS Mormugao Dainik Gomantak
देश

INS Mormugao: आत्मनिर्भर भारताचं आणखी एक पाऊल! नौदलात INS मोरमुगाओ दाखल

जवळपास 76 टक्के भारतीय बनावटीची असलेली INS Mormugao ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचे नौदल अधिक शक्तीशाली झाले आहे. कारण आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) ही 15 बी प्रोजेक्टची दुसरी युद्धनौका भारतीय नौदलात (Indian Navy) दाखल झाली आहे. आज या युद्धनौकेच कमिशनिंग झाले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.

आयएनएस विशाखापट्टणमनंतर सर्वात अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली आयएनएस मोरमुगाओ ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विनाशक युद्धनौका आहे. मुंबईत (Mumbai) माझगाव डॉकमध्ये ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील 4 नौकांची निर्मिती करण्याची घोषणा 2011 मध्ये करण्यात आली होती.

यानंतर माझगाव डॉकमध्ये तयार झालेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आयएनएस मोरमुगाओ ही दुसरी नौका आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ही भारतीय नौदलाच्या (Indian Navy) सेवेत दाखल झाली आहे. 

भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ युद्धनौकेवर भारतीय नौदलाचा झेंडा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते फडकवण्यात आला. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, युद्धनौका आपली ताकद आहे. युद्धनौका तयार करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे कौतुक असून आम्ही त्यांचे आभार मानतो. भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला

छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा इतिहास आहे. अशा या राज्यात मोरमुगाओ सेवेत दाखल होत आहे, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.

'मोरमुगाओ' या नावामागे गोवा (Goa) मुक्ती संघर्षाचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले. नौदलाच्या माध्यमातून गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला दिलेली ही मानवंदना असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. 'मेकिंग इंडिया' (Making India) अंतर्गत आपण फक्त भारतासाठी (India) नाही तर पुढे जगासाठी आपण युद्ध नौका बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • आयएनएस मोरमुगाओची वैशिष्ट्य काय आहेत ?

आयएनएस मोरमुगाओ ही आयएनएस विशाखापट्टणम सारखीच ब्राह्मोस, बराक क्षेपणास्त्र, दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एमएफस्टार रडार, हायटेक इलेक्ट्रिकल वॉरफेअर सिस्टिम , स्वदेशी रॉकेट लाँचर, सागरी देखरेख रडारने सुसज्ज आहे. त्याशिवाय, आकाशात मारा करणारे मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रांचा मारा या युद्धनौकेवरून करता येऊ शकतो. त्याशिवाय, हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणादेखील आहे.

या नौकेतील 76 टक्के यंत्रणा भारतीय बनावटीची आहे. 'शौर्य, पराक्रम व विजयी भव' ही आयएनएस मोरमुगाओची युद्धघोषणा आहे. ‘डी 67’ हा या नौकेचा क्रमांक आहे. 'प्रोत्साहित आणि मोहिम सज्ज' असे आयएनएस मोरमुगाओचे ब्रीदवाक्य आहे.

  • मोरमुगाओ या नावाचा इतिहास

मोरमुगाओ नावाचे शहर गोव्यात समुद्रकिनारी आहे. या शहराला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. पण शहराचे मूळ नाव मोरमुगाओ आहे. मोरमुगाओ हे गोवा मुक्ती संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र होते. याच कारणामुळे नव्या विनाशिकेला मोरमुगाओ हे नाव देऊन नौदलाच्या माध्यमातूम गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला सलामी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT