Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

Jugaad Video Viral: भारतात अनेक कामे केवळ 'जुगाड'ने होतात. लोक जेव्हा कोणत्याही अडचणीत सापडतात आणि दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही.

Manish Jadhav

Jugaad Video Viral: भारतात अनेक कामे केवळ 'जुगाड'ने होतात. लोक जेव्हा कोणत्याही अडचणीत सापडतात आणि दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही, तेव्हा भारतीयांचे जुगाडू डोके चालायला लागते. अनेकदा पैसे वाचवण्यासाठी किंवा नुसतेच बसलेले असताना लोक असे अनोखे जुगाड करतात आणि त्यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक अविश्वसनीय जुगाडू व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. सोबतच अनेकजण मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. तुम्ही यापूर्वी अनेक जुगाड पाहिले असतील, पण ट्रेनचा वापर करुन केलेला हा 'महा-जुगाड' खरोखरच चकित करणारा आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एक स्टीलची मोठी पेटी दिसत आहे. ही पेटी ट्रेनमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्यासाठी वापरलेली पद्धत खूपच अनोखी आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, ही जाड पेटी एका मजबूत कपड्याने किंवा दोरीने व्यवस्थित बांधण्यात आली आहे. त्यानंतर ही दोरी ट्रेनच्या अगदी शेवटच्या डब्यामागे असलेल्या हुकमध्ये (Hook) अडकवण्यात आली. याचा अर्थ, ट्रेन जेव्हा पुढे सरकेल, तेव्हा ही पेटी रेल्वे ट्रॅकवरुन ओढली जाईल आणि त्या व्यक्तीच्या इच्छित स्थळी पोहोचेल. व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती ही घटना बिहारमधील जमुई येथील असल्याचे सांगत आहे.

हा व्हिडिओ 'Rost Reaction' नावाच्या अकाउंटवरुन फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहिण्यापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

यूजर्सच्या प्रतिक्रिया

हा धोकादायक आणि मजेशीर जुगाड पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, "या असल्या कृत्यांमुळेच बिहार बदनाम होतो."

  • दुसऱ्या युजरने विनोद केला, "यांचे चालले तर हे अख्खे इंजिनच इकडे घेऊन येतील."

  • तिसऱ्या युजरने लिहिले, "अशा प्रतिभावान लोकांमुळेच बिहार जगभर प्रसिद्ध आहे."

  • चौथ्या युजरने प्रतिक्रिया दिली, "बिहारला बदनाम करुन ठेवले आहे."

ट्रेनला सामान बांधून प्रवास करण्याचा हा अत्यंत धोकादायक जुगाड केवळ 'मौज' म्हणून व्हायरल झाला असला, तरी यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

VIDEO: मिचेल स्टार्कचा 'वन हँड' चमत्कार! स्वतःच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारुन पकडला अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT