Desi Jugaad Viral: सोशल मीडियावर भारतीय लोक आणि त्यांचे 'देसी जुगाड' (Desi Jugaad) नेहमीच चर्चेत असतात. नुकताच एक व्हिडिओ समोर आला, ज्यात एका तरुणाने जुगाडची कमाल करत सगळ्यांनाच चकित केले. या तरुणाने हेल्मेटऐवजी एका जुन्या टीव्हीचे (Television) रिकामे आवरण डोक्यावर हेल्मेटसारखे घातले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स 'हसायचे की डोक्याला हात लावायचा' अशा द्विधा मनस्थितीत आहेत.
हा 'देसी जुगाड'चा व्हिडिओ एक्स (X) प्लॅटफॉर्मवर @Pra7oel नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल, तर तुम्ही जुन्या खराब टीव्हीनेही काम चालवू शकता."
व्हिडिओमध्ये दिसते की, दुचाकी (Bike) चालवणारा हा तरुण टीव्हीच्या (TV) कॅबिनेटचा सांगाडा घेऊन बसलेला आहे. बाईक चालवण्यापूर्वी तो हा सांगाडा हेल्मेटप्रमाणे आपल्या डोक्यावर घालतो, जो पाहायला खूपच अजीब आणि हास्यास्पद वाटत आहे. हा जुगाड पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हा व्हिडिओ (Video) आतापर्यंत जवळपास 15 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आणि शेकडो लोकांनी त्याला लाईकही केले. याशिवाय, या 'देसी जुगाड'वर अनेक यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
एका युजरने चिंतेची बाजू मांडत लिहिले, "पण दुर्घटनेच्या वेळी हा जीव वाचवण्याऐवजी डोक्यात घुसेल."
दुसऱ्या एका युजरने याला सकारात्मक संदेश मानले. त्याने लिहिले, "हा एक मजेदार आणि हलका संदेश आहे. सुरक्षेच्या संदर्भात असो वा संसाधनांच्या यामुळे विचार करायला लागतो की कधी कधी सर्जनशील (Creative) मार्ग देखील उपयोगी पडू शकतात."
तिसऱ्या युजरने चेतावणी दिली, "हा जुगाड बाहेर जाऊ नये."
तर एका अतिउत्साही युजरने लिहिले, "किती तेजस्वी लोक आहेत, काय काय डोके लावतात! याला तर भारतरत्न (Bharat Ratna) मिळायला हवा."
हा व्हिडिओ केवळ मनोरंजनच करत नाही, तर भारतीय लोकांच्या कोणत्याही समस्येवर त्वरित तोडगा काढण्याच्या 'जुगाडी' वृत्तीचेही दर्शन घडवतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.