Indian Army Dainik Gomantak
देश

Indian Army: भारतीय लष्कराचा 'चाणक्य रक्षा संवाद', टॉक शोमध्ये जगातील 'या' बलाढ्य शक्तींचा सहभाग

Chanakya Raksha Samvad Talk Series: चाणक्याच्या कुशल मुत्सद्देगिरीचा आणि अचूक निर्णयांचा वापर भारतीय लष्कर आता संरक्षणाच्या बाबतीत करणार आहे.

Manish Jadhav

Chanakya Raksha Samvad Talk Series: चाणक्याच्या कुशल मुत्सद्देगिरीचा आणि अचूक निर्णयांचा वापर भारतीय लष्कर आता संरक्षणाच्या बाबतीत करणार आहे. यासाठी भारतीय लष्कराने आजपासून 'चाणक्य रक्षा संवाद' ही संवाद मालिका सुरु केली आहे.

हा कार्यक्रम राबवण्यासाठी भारतीय लष्कर आर्मी सेंटर फॉर लँड अँड वॉरफेअर स्टडीज या अग्रगण्य थिंक टँकसोबत काम करत आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

सुरक्षेच्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज

दरम्यान, या संदर्भात आज पत्रकारांशी संवाद साधताना लष्करप्रमुख म्हणाले की, आपण जगात अभूतपूर्व बदल पाहत आहोत. वेगाने घडत असलेल्या जागतिक घडामोडींमध्ये आपण राष्ट्रीय हिताला केंद्रस्थानी ठेवले आहे.

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा दाखला देत लष्करप्रमुख म्हणाले की, आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. लष्करप्रमुख पुढे असेही म्हणाले की, आज आपले सैन्य सुरक्षेच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे.

रशिया-युक्रेन युद्ध एक धडा

चीन (China) आणि पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या सीमा विवादावर लष्करप्रमुख म्हणाले की, सध्या सीमेवरील स्थिती सामान्य आहे, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आमच्यासाठी जशी आव्हाने आहेत तशा संधीही असतील, रशिया-युक्रेन युद्ध हा धडा आहे की, आम्ही शस्त्रास्त्रांचा वापर करु नये.

लष्कराचे लक्ष सुरक्षा दलांची पुनर्रचना, विद्यमान संरचनांमध्ये सुधारणा आणि मानव संसाधन व्यवस्थापन यावर आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणावर आम्ही विशेष भर देत आहोत.

ते पुढे म्हणाले की 40,000 अग्निवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल झाल्याने सैन्याची ताकद वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT