MIG 21 Crash Rajashtan
MIG 21 Crash Rajashtan dainik gomantak
देश

IAF's MiG-21 crash in Rajasthan Video: हवाई दलाचे मिग-21 विमान घरावर कोसळले, दोन जणांचा जागीच मृत्यू

Pramod Yadav

IAF's MiG-21 crash in Rajasthan Viral Video: राजस्थानमधील हनुमानगडमध्ये सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना झाली आहे. येथे हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले आणि निवासी भागात पडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. मात्र, दोन्ही पायलट स्वत:ला बाहेर काढण्यात यशस्वी झाले.

विमानाने सुरतगडहून उड्डाण केले होते. बहलोलनगर येथे अपघात झाला. विमान कोसळले आणि एका घरावर पडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक व्यक्ती जखमी आहे. अशी माहिती समोर आली आहे.

हवाई दलाने एक निवेदन जारी करून या अपघाताची माहिती दिली आहे. हवाई दलाच्या मिग-21 ने आज सकाळी नियमित प्रशिक्षण उड्डाण केले होते. त्यानंतर ते कोसळले आहे. दोन्ही पायलट स्वत:ला सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

याआधी जुलै 2022 मध्ये राजस्थानच्या बारमेरजवळ प्रशिक्षणादरम्यान मिग-21 विमान कोसळले होते. या अपघातात भारतीय हवाई दलाचे (IAF) दोन वैमानिक शहीद झाले होते.

मिग-21 क्रॅशच्या आजच्या घटनेने पुन्हा एकदा सोव्हिएत बनावटीच्या मिग-21 विमानांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मिग-21 विमानांचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला समावेश करण्यात आला होता आणि 2022 पर्यंत मिग-21 विमानांचे सुमारे 200 अपघात झाले आहेत.

मिग-21 हे दीर्घकाळ भारतीय हवाई दलाचा मुख्य आधार होते. मात्र, विमानाचा सुरक्षेचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. विमान अपघातातही अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांत तीन सेवांच्या विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात 42 संरक्षण जवानांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण 45 हवाई अपघात झाले, त्यापैकी 29 IAF प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT