Air Force Dainik Gomantak
देश

'अग्नवीर'साठी वायुसेनेने जारी केले नोटिफिकेशन, 24 जूनपासून होणार नोंदणी

वायुसेनेने अग्निपथ योजनेबाबत अधिसूचना जारी केली आहे.

दैनिक गोमन्तक

वायुसेनेने अग्निपथ योजनेबाबत अधिसूचना जारी केली आहे. यासाठी 24 जूनपासून नोंदणी सुरु होणार आहे. याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी 'अग्निपथ' योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून ही योजना आता परत घेतली जाणार नसल्याचे सांगितले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणाले की, उद्याच्या भविष्यासाठी हा बदल आवश्यक आहे.

तत्पूर्वी, 'अग्निपथ' भरती धोरणावरुन वाद आणि विरोध होत असताना, भारतीय लष्कराने (Indian Army) 20 जून रोजी नवीन नियमांनुसार भरतीसाठी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार, सैन्यातील भरतीसाठी पुढील महिन्यात जुलैपासून नोंदणी सुरु होत आहे. इच्छुक अर्जदारांना भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

डोवाल पुढे असेही म्हणाले, ''राजकीय इच्छाशक्तीमुळे हा निर्णय रखडला होता. परंतु आता भविष्याची गरज लक्षात घेऊन मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. परिस्थितीनुसार रचना बदलावी लागेल. संरक्षण क्षेत्रात प्रत्येक स्तरावर सुधारणा होत आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सरकार नवीन शस्त्रे खरेदी करत आहे. आपल्या सैन्याला जागतिक दर्जाचे सैन्य बनवायचे आहे.''

खरं तर, एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) म्हणाले की, ''भारताभोवतीचे (India) परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. परिस्थितीनुसार रचना बदलावी लागेल. संरक्षण क्षेत्रात प्रत्येक स्तरावर सुधारणा होत आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सरकार नवीन शस्त्रे खरेदी करत आहे. आपल्या सैन्याला जागतिक दर्जाचे सैन्य बनवायचे आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

FIFA World Cup 2026: रोनाल्डो, मेस्सी आणि एमबाप्पे...फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार; येथे पाहा सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Goa Road Accidents: राज्यात अवघ्या 15 दिवसांत 17 जणांचे अपघाती मृत्यू , जून घात महिना, मृत्यूंचा आकडा वाढला

SCROLL FOR NEXT